दमदार आमदार सुरेश धस यांच्या मागणीला यश..आष्टी एसटी महामंडळामध्ये पाच लालपरी दाखल.
नवीन दाखल झालेल्या पाच " लालपरींमुळे "आष्टी आगाराला मिळेल..ऊर्जा..
-- नगराध्यक्ष जिया बेग
आष्टी (प्रतिनिधी )
राज्य मार्ग परिवहन महामंडळ आष्टी आगाराचे दररोजचे सात ते आठ लाख रुपये लाख उत्पन्न असूनही आष्टी आगारातील अर्ध्याहून अधिक बस दहा वर्षाच्या पुढच्या असून बस बसेस या वय संपलेल्या असूनही सेवेत आहेत त्यामुळे
नविन बस नसल्यामुळे लांब पल्ल्यांच्या बस सेवा सुरू करता येत नव्हत्या त्यामुळे प्रवाशांची होणारी हेळसांड पाहता आ. सुरेश धस यांनी परिवहन मंत्री आणि महाव्यवस्थापक यांच्याकडे सतत पाठपुरावा त्यामुळे आष्टी आगाराच्या ताफ्यात पाच नवीन लाल परी बसेस आष्टी आगारात दाखल झाल्या आहेत त्यामुळे आगाराचा नवीन ऊर्जा मिळणार आहे असे प्रतिपादन आष्टी नगरपंचायत चे नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आष्टी येथील परिवहन महामंडळ आगारामध्ये नवीन पाच लालपरी बसेस दाखल झाल्या आहेत त्यांचे स्वागत करताना ते बोलत होते यावेळी वाहतूक नियंत्रक हर्षद गुगळे मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष गणेश नाना शिंदे नगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,खंडू जाधव,अजित मुळे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत,प्रवीण कदम,शमशोद्दीन, नगरसेवक सुरेश वारंगुळे, नगरसेवक श्याम वाल्हेकर,आष्टी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रविण पोकळे,पत्रकार शरद रेडेकर, पत्रकार रघुनाथ कर्डीले, पत्रकार गणेश दळवी,पत्रकार सचिन रानडे,आगार व्यवस्थापक चोथमल,वाहक सचिन काळे,मुख्तार तांबोळी,के.जी.गव्हाणे,राजेंद्र बांगर,रघुनाथ ससाणे,शरद झांबरे,बाबू कुरेशी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिया बेग म्हणाले आमदार सुरेश धस यांनी आष्टीच्या आगाराकडे सतत लक्ष दिलेले आहे मध्यंतरी त्यांनी स्वखर्चातून टायर चेंज मशीन आगारासाठी भेट दिले आहे आता या नवीन बसेस आल्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांची हेळसांड थांबेल असा विश्वास व्यक्त केला..
आष्टीच्या आगारातील निम्म्याहून अधिक बसेस जुन्या झाल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे
आ.सुरेश धस यांनी परिवहन मंत्री, महाव्यवस्थापक या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधल्यानंतर एसटी महामंडळाने तातडीने हालचाली सुरू केल्या.आणि आष्टी आगारासाठी अत्याधुनिक अशा पाच नवीन बीएस-६ गाड्या आज गुरुवारी (१५ मे) दुपारी आगारात दाखल झाल्या या पाच लाल परी बसेसच्या स्वागत करण्यात आले तर प्रवाशी चालक-वाहक व आगारातील कर्मचारी यांनी आ.सुरेश धस यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
गाड्यांचे आगमन आणि उत्साही स्वागत
आष्टी आगारात आज दुपारपर्यंत बीएस-६ प्रकारच्या पाच नव्या गाड्या दाखल झाल्या असून,या गाड्यांच्या आगमना नंतर आष्टीकर नागरिक व प्रवाशांच्या वतीने नवीन लाल पऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी या पाच ही लालपरींची आष्टी शहरातून फेरी आयोजित करण्यात आली...
---------------------------------------------------
stay connected