"जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात आष्टी उपविभागाला श्री विजय पाखरे मुळे बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक"

 "जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात आष्टी उपविभागाला श्री विजय पाखरे मुळे बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक"




महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने नामदार जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जल व्यवस्थापनाची चळवळ लोकचळवळ व्हावी तसेच जलसाक्षरता निर्माण व्हावी, यासाठी "जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा" 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यभर जलसंपदा विभाग यांनी राबविण्यात आला.


या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये जल व्यवस्थापनावरील पंधरा दिवस विविध  उपक्रम राबवले गेले. जलसाक्षरता ही  लोकचळवळ उभी राहावी यासाठी जल व्यवस्थापनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोचवण्यात आले.



उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांची निवड करून त्यांचा सन्मान व गौरव करण्यासाठी 30 एप्रिल 2025 रोजी बीड येथील हॉटेल यशोदा येथे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री. चंद्रकांत शेळके (तहसीलदार, बीड), अध्यक्ष  श्रीमती पल्लवी जगताप (पालक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड), प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राम बोडखे  व श्री. मधुकर वाघ सर हे होते. कार्यक्रमास श्री. सुरेश पवार, श्री. जयंत इनामदार व श्री. विनायक नखाते व बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यामधील  जलसंपदा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.



        जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा  उपक्रमात आष्टी उपविभागाने उत्कृष्ट कार्य करून बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. हा मान मिळवण्यासाठी श्री. विजय पाखरे (उपविभागीय अधिकारी), श्री. ओम डोके (शाखाधिकारी), श्री. ज्ञानेश्वर देशमुख (शाखाधिकारी) आणि आष्टीच्या संपूर्ण जलसंपदा विभागाच्या टीमने अथक मेहनत घेतली. सलग पंधरा दिवस विविध उपक्रम व जनजागृती मोहिमा राबवून जल व्यवस्थापनाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. त्यामुळेच आष्टी तालुक्याला  हे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. जशास्वरूपाची आर आर आबांनी ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ राबवली होती.अशीच चळवळ जल संपदा विभागामार्फत ना. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जल व्यवस्थापनाच्या बाबत महाराष्ट्रात राबवण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत असून बीड जिल्ह्यामध्ये त्याला काही प्रमाणात यश आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.