छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या लढ्याला अखेर यश..- दत्ताभाऊ बोडखे

 छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या लढ्याला अखेर यश..- दत्ताभाऊ बोडखे 

----------------


मोदी सरकारच्या ऐतिहासिक व क्रांतीकारी निर्णयाचे समता परिषदेच्या वतीने स्वागत! 

------------------

 


 

------------------

आष्टी (प्रतिनिधी)

मोदी सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देशातील ओबीसी समाजाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले जात आहे. मोदी सरकारचा हा निर्णय 

ऐतिहासिक व क्रांतिकारी आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार आहे.आष्टी तालुका  समता परिषदेने येथील म.फुले यांच्या चौकात फटाके वाजवून आणि पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी १९९२ पासून अ.भा.म. फुले समता परिषदेच्या माध्यमातून सातत्याने विविध आंदोलने करुन  पाठपुरावा करण्यात आला आहे.भरतात अनेक मोठ्या शहरात  झालेल्या म.फुले समता परिषदेच्या महामेळाव्यामध्ये  छगन भुजबळ यांनी देशातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली होती.२०१० मध्ये जातनिहाय जनगणना करण्यासाठी समता परिषद सर्वोच्च न्यायालयात गेली होती.तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून संसदेत जोरदारपणे ही मागणी केली होती. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यानंतर देशाभरातील तब्बल १०० खासदारांचा भक्कम पाठिंबा मिळाला.या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री स्व.प्रणव मुखर्जी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली परंतु तेव्हा नगरविकास व ग्रामविकास खात्यामार्फत केवळ सर्वेक्षण करण्यात आले.नंतरच्या काळात देशात मोदी सरकार आल्यानंतर पुन्हा या मागणीसाठी ओबीसीचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी पाठपुरावा सुरु केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील पत्राद्वारे, तसेच व्यक्तिगत रीत्या ही मागणी मांडली होती.आता संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना होणार असल्याने ही संपूर्ण देशातील सर्व प्रवर्गातील मागास घटकांसाठी आनंदाची बाब आहे.आष्टी शहर व तालुक्यातील समता सैनिकांनी मोठ्या उत्सहात या निर्णयाचे स्वागत  केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.