किरण शिनगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर संपन्न
*****************************
*****************************
आष्टी प्रतिनिधी- आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण भगवानराव शिनगीरे यांच्या वाढदिवसानिमित्त वटणवाडी येथे दिनांक 26 एप्रिल 2025 मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन डॉ. नाथ डेंटल क्लिनिक, कडा व भगवान दादा शिनगीरे युवा मंच आष्टी तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. डॉ. महेश नाथ व त्यांच्या संपूर्ण टीमने गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोफत तपासणी व दंत उपचार केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयदत्त भैय्या धस, भगवानराव शिनगीरे, सरपंच संदीप खकाळ, माजी सरपंच छगन शिनगीरे, बाळासाहेब पोकळे यांची उपस्थिती लाभली. शिबिरास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 150 पेक्षा जास्त नागरिक व विद्यार्थी तपासणीसाठी उपस्थित होते.
डॉ. महेश नाथ यांनी सर्व उपस्थितांना कार्ड वितरित करून पुढील मोठ्या दंत उपचारांसाठीही मोफत सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले. या उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना फायदा मिळाला.
यावेळी जयदत्त भैय्या धस यांनी सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत किरण शिनगिरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. किरण शिनगिरे यांनी देखील येणाऱ्या काळात अधिक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी किरण शिनगिरे यांचा वाढदिवसानिमित्त जयदत्त भैय्या धस, डॉ. महेश नाथ व संदीप खकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमासाठी नवनाथराव साबळे, वसंत नरवडे, बळीराम शिनगीरे, महेश शिनगीरे, संतोष मेहत्रे, संतोष वायकर, प्रवीण शिनगिरे, हनुमंत शेलार, हनुमंत कुमखाले, राज शिनगीरे, दादा गायकवाड,रेवन जाधव, प्रभाताई वायकर, मुख्याध्यापिका सुवर्णा भोरे मॅडम, काळे मॅडम, गुंजाळ मॅडम, सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथे गोरगरीब, अनाथ निराधार मुलांना शालेय साहित्य, खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
stay connected