chh.sambhajinagar | शिवजयंतीमध्ये बिष्णोईचे पोस्टर झळकविणारा पोलिसांच्या ताब्यात
- छत्रपती संभाजीनगर शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाने थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचे पोस्टर झळकवल्याने शहरात खळबळ उडाली होती.या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या निर्देशानंतर गुरुवारी रात्री पोस्टर झळकविणाऱ्या तरुणाला क्रांती चौक पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले.दर्शन ऊर्फ विशाल शाम पवार असेया तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.
शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली होती मात्र या जयंतीच्या जल्ल ोषात क्रांती चौकात काही तरुणाच्या टोळक्याने थेट कुख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर झळकविले.त्यावर गांधी द्वेष असलेली वाक्य लिहिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरच्या बाजूला बोष्णोईचे पोस्टर झळकल्याने शिवभक्तांसह सर्वस्तरातून संताप व्यक्त होत होता.आम्ही गांधीला नाही तर शिवाजी महाराज आणि महाराणा यांच्यासारख्या धुरंधरांना मानणारे आहोत,असा मजकूर पोस्टरवर लिहिला होता.पोलिस बंदोबस्त असताना तरुणाकडून असा प्रकार होत असल्याने पोलिसांचा धाक उरला नाही का, असाही सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील माने,विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक इंगोले यांनी दर्शन पवारला ताब्यात घेतले.याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्याचा टोळीशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करणार आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ, रिल्स पाहून तरुण या टोळीमध्ये सक्रिय होऊ पाहत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. तर या प्रकरणावर बोलताना पोलीस अप आयुक्त नितीन बागाटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात गुंडांचे पोस्टर झळकविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा,असल्या फटीचर गुंडाचा आदर्श घेऊ नये.कोणीही समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई होणारच. त्याने गँगस्टरचा फोटो दाखवून दहशत माजविली म्हणूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत




stay connected