बीड जिल्हा पत्रकार संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी प्रविण पोकळे यांची नियुक्ती

 बीड जिल्हा पत्रकार संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी प्रविण पोकळे यांची नियुक्ती





आष्टी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेने नुकत्याच जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून यामध्ये आष्टी तालुकाध्यक्ष पदी प्रविण राम पोकळे यांची नियुक्ती केली आहे.

               महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य समन्वयक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी तोंडे आणि जिल्हाध्यक्ष शेख रिझवान यांनी जिल्ह्यातील नवीन तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे.पत्रकार प्रविण पोकळे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे लोकनेते आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,युवा नेते जयदत्त धस, युवा नेते सागर धस,जि. प.माऊली जरांगे,नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे, उद्योजक बंडू तोडकर,आष्टी तालुका पत्रकार संघ,आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, पुरोगामी  पत्रकार संघ,प्रेस क्लब, बेलगाव ग्रामस्थ,मित्रपरिवार यांच्यासह राजकीय, सामाजिक,व्यापारी सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.