आ.सुरेश धस मस्साजोग येथे स्व.देशमुख आणि परळी येथे स्व.मुंडे कुटुंबियांची भेट घेणार..
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आज मस्साजोग येथे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तर परळी येथे जाऊन स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
याविषयी वृत्त असे की, दि.9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग ता.केज येथील सरपंचांची निर्घृण हत्या झाली याविषयी विधानमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये आ. सुरेश धस यांनी हा प्रश्न धसास लावल्यामुळे स्व.देशमुख कुटुंबियांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सहानुभूतीपूर्वक पाठींबा मिळाला या प्रकरणातील मास्टरमाइंड अद्याप ही मोकाट असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेत आक्रोश आहे..तर स्व.महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी पंधरा महिन्यांनंतर देखील अटक तर नाहीच पण साधी चौकशी सुध्दा झाली नाही.
याबाबत देखील आ.सुरेश धस यांनी आक्रमक होऊन पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीबाबत आवाज उठवल्यानंतर पोलीस विभागाने तपास यंत्रणा बदलली आहे.या पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस परळीला जाऊन स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. आज सकाळी 8.15 वाजता मस्साजोग देशमुख यांचेकडे तर 12.15 वाजता परळीला मुंडे कुटुंबियांची निवासस्थानी भेट देणार आहेत..

stay connected