*शिक्षणातून विद्यार्थी व्यवसायाभिमुख बनला पाहिजे - श्री. एन. बी.धुमाळ*
कडा दि. 18 फेब्रुवारी 2025- सध्याचा काळ संवेदनशील असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून घेतले पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे.नोकऱ्यांच्या संधी फार कमी आहेत.त्यासाठी आपण व्यवसायातील कौशल्ये प्राप्त करून घेतल्यास मोठे उद्योजक बनू शकतो. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योजक श्री. एन. बी. धुमाळ यांनी केले.
मंगळवार दिनांक. 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता एन. बी. धुमाळ साहेबांच्या हस्ते कडा येथील गांधी महाविद्यालयाचे आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळेच उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त उपाध्यक्ष श्री बाबुलालजी भंडारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी होते तसेच प्रा.नवनाथ पडोळे, प्राचार्य सय्यद सर, प्रा भवर सर, सौ. धुमाळ मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री एन बी धुमाळ साहेब पुढे म्हणाले शिक्षणातून नव्या पिढीला व्यवसायाचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे.विद्यार्थ्यांचे वाचन वाढले पाहिजे. "बडी सोच, कडी मेहनत व पक्का इरादा " असेल तर विद्यार्थी लवकर आपल्या ध्येयापर्यत पोहचू शकतात. त्यासाठी त्यांनी केवळ नोकरी हा ध्यास न ठेवता व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून घेतले पाहिजेत. जीवनात खूप मोठे झालो तरी आई-वडील या देवतांना न विसरण्याचा संदेश त्यांनी दिला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी त्यांनी त्यांच्या "यशाचे १११ मंत्र" या पुस्तकाच्या 111 प्रति भेट दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुकाराम गोंदकर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.अनिल गर्जे यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा. विलास वाघुले यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अमोल कल्याणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अण्णासाहेब शेळके,डॉ. विष्णू गव्हाणे, प्रा. बोरा मॅडम ,प्रा. बोंदार्डे सर,प्रा. कोल्हे मॅडम ,श्री वीर बापू तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.


stay connected