गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बीजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे येणार

 *गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बीजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे येणार*



कडा: येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे, गांधी महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड येथे दि. 21 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील भूगोल व वनस्पतीशास्त्र विभागाने " पर्यावरण संरक्षण आणि मानवी कल्याणासाठी शास्वत कृषी विकास" या विषयावर एक दिवसीय बहुविषयक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील परीषदेचे उदघाटक व प्रमुख पाहूणे म्हणून पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे (बीजमाता) व संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्री कांतीलाल चानोदिया, संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री गोकुळदास मेहेर संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिल झाडमुथा, श्री बिपिन भंडारी संस्थेचे सचिव श्री हेमंत पोखरणा, संस्थेचे मंत्री डॉ महेंद्र पटवा, विनोद बलदोटा, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी व संस्थेचे सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच पर्यावरण प्रेमी, संशोधक, मार्गदर्शक, विद्यार्थी यांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली असून देशभरातून प्राध्यापक या परिषदेसाठी उपस्थित राहून आपले संशोधन निबंध वाचन करणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांनी दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.