आनंदराव धोंडे महाविद्यालयात शिवजयंती निमित्त माजी विद्यार्थी तथा पालक मेळावा संपन्न.
आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी विद्यार्थी तथा पालक मेळावा आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक वर्षी आनंदराव धोंडे उर्फ बाबाबी महाविद्यालयात शिवजयंती साजरी करून पालक मेळावा व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात पालक व माजी विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
आजच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी.विधाते सर यांनी अध्यक्ष पद भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष भादवे सर, व टी.एम.टाक सर, बाबूलाल भंडारी, मा.उपप्राचार्य वाघोली बी.एम. कर्डिले महाराज इत्यादी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुभाष भादवे सरांनी सखोल असे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शौर्याच्या गोष्टी,कलागुणाची माहिती दिली. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे टाक सर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आजही समाजामध्ये कशा स्वरूपाचे उपयोग आहे. तसेच त्यांनी सभासद व चिटणीस बखर वरती ही माहिती सांगितली. बाबूलाल भंडारे यांनीही आपले मनोगत मांडले. माजी विद्यार्थी व पालकांनी हे आपले मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य साहेबानी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे समाजाला प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या विचारावरती चालणारे होते. माजी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयात अनेक स्वरूपाच्या सुख सुविधा उपलब्ध झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. तसेच पालक वर्ग ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्राचार्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. खैरे सरांनी केले. प्रास्ताविक डॉ.संभाजी ओव्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर डी एस बोडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.श्याम सांगळे, डॉ. राम बोडखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकी तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. अशाप्रकारे आमच्या महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न करण्यात झाला.




stay connected