समीर शेख राज्यस्तरीय मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा पुरस्काराने सन्मानित..
आ.इद्रीश नाईकवडी व समीर काजी यांच्या हस्ते समाजसेवक पुरस्काराने सन्मानित..
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण समीर शेख यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, त्यासोबत दांडगा राजकिय संपर्क असलेले व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज न्यायव्यवस्थेपर्यंत पोहचवत, प्रश्न मार्गी लावणारे, विविध सामाजिक उपक्रम घेऊन सर्वधर्मसमभाव संदेश देत आहेत, सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, सुरेश (आण्णा) धस यांचे स्वीय सहाय्यक समीर बादशहा शेख यांच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यची दखल घेत सन 2024-25 या वर्षाचा राज्यस्तरीय मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. या आगोधर सन 2022-23 मध्ये यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
दैनिक दिव्य वार्ता आणि साप्ता.कश्मकशच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त गोरगरीब महिलांना शिलाई मशीन व गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप तसेच समाजातील विविध घटकांतील नागरीकांनसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा सोहळा आयोजन करण्यात आले होते
यावेळी वक्फ बोर्डाचे चेअरमन मा.समीर काजी,विधान परिषदेचे आमदार मा.इद्रीश नाईकवडी , मा.आ सिराज देशमुख, मा.आ.राजेंद्र जगताप,शफीक भाऊ, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.सलीम जहांगीर, यशराज पंडित,दैनिक दिव्या वार्ता/साप्ता.कश्मकश चे संपादक अबुबकर चाऊस, लोकशा संपादक विजय बंब , लोकप्रभा संपादक संतोष मानुरकर, दैनिक वास्तव संपादक जितेंद्र सिरसाठ, सिटीजन कार्यकारी कार्यकारी संपादक चंदन पठाण लोकमित्रचे संपादक हमीदखान पठाण, कासम शेख ,जावेद शेख, सोमीनाथ कोल्हे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे विविध क्षेत्रातून समीर शेख यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे..



stay connected