वनपरिमंडळ आष्टी व कडा अंतर्गत असलेल्या सर्व पाणवठ्यामध्ये टँकरने पाणी सोडून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
मा.विभागीय वनअधिकारी बीड ए.बी.गर्कळ यांच्या आदेशावरुन व वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ आष्टी व कडा अंतर्गत असलेल्या सर्व पाणवठ्यामध्ये टँकरने पाणी सोडून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली यासाठी कडा राउंडचे वनपाल एल.व्ही.तागड यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले सर्व वनरक्षक श्रीमती के.बी.विधाते मॅडम वनरक्षक पिंपरखेड,श्री.ए.एस.काळे वनरक्षक देवळाली,श्री.के.डी. पंडलवाड वनरक्षक धामणगाव व आष्टी राउंडचे वनपाल डी.डी.जायभाय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले वनरक्षक श्री.बी.ए.शिंदे वनरक्षक बीडसांगवी,श्री.बी.पी.यादव,वनरक्षक मातावळी,श्री.जे.बी.आरगडे वनरक्षक बीडसंगावी यांनी परिश्रम घेतले.








stay connected