शेतकऱ्यांनी शेती कामामध्ये ट्रॅक्टर व आधुनिक अवजारांचा वापर करावा - आ सुरेश धस
आष्टीत स्वराज ट्रॅक्टर शोरूमचे उद्घाटन आ सुरेश धस यांच्या हस्ते तर माजी आ बाळासाहेब आजबे, माजी आ भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
आष्टी। ए बी कदम
आष्टी येथील सावळेश्वर ट्रॅक्टर्स शोरुम धोंडे पेट्रोल पंपासमोर सुरू केले असून या शोरूमचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आ सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी आ बाळासाहेब आजबे, माजी आ भीमराव धोंडे, मुरलीधर आजबे,सतीश शिंदे, बद्रीनाथ जगताप, डॉ शिवाजी राऊत, काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब घुले,सरपंच सुधीर पठाडे, दत्तात्रय खोटे,बबन कराडे, दादासाहेब जगताप, सुनिल सुर्यवंशी, सुभाष गणगे, सेवा निवृत्त नायब तहसीलदार गिते साहेब,पै फिरोज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ सुरेश धस म्हणाले की
शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व सबरी आणि महात्मा फुले विकास महामंडळ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करावा आणि स्वराज ट्रॅक्टर योग्य असून त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा रमेश दादा आजबे हे शेतकरी व सर्वसामान्य घटकांना सवलत नक्कीच देतील आणि त्यांचे शोरुम अनेक जिल्ह्यांत असून ते योग्य उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे ते शेतकऱ्यांना योग्य किमतीत ट्रॅक्टर देत आहेत आणि सहकार्य करत आहेत तर शेतकऱ्यांनी शेती कामामध्ये ट्रॅक्टर व आधुनिक अवजारांचा वापर करावा असे प्रतिपादन आ सुरेश धस यानी बोलताना केले.यावेळी माजी आ बाळासाहेब आजबे व माजी आ भीमराव धोंडे यांनी शोरुमच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.स्वराज ट्रॅक्टरचे डिलर रमेश आजबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले. या कार्यक्रमास सरपंच परिवत गायकवाड, सुभाष गणगे,के के काकडे,गणेश डोके,अकरम सय्यद, सलमान बागवान,गणेश डोके,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, अविनाश कदम, राजेंद्र लाड, अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, सोपान पगारे आदी शेतकरी, नागरिक, व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




stay connected