विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन न होता शिक्षणाकडे वळून स्वतःची सर्वांगीण प्रगती करून घ्या-मिर्झा उबेद बेग

 विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन न होता शिक्षणाकडे वळून स्वतःची सर्वांगीण प्रगती करून घ्या-मिर्झा उबेद बेग 




आष्टी /प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावी पूर्ण झाल्यानंतर शालेय शिक्षण संपते मात्र महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुरुवात करत असताना विद्यार्थ्यांनी व्यसनाकडे नव्हता अभ्यासाकडे वळून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करावी आणि जगाच्या धावत्या स्पर्धेमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत करून यश संपादन करावे शिक्षणाशिवाय पर्याय नसून व्यसनाधीनाकडे नव्हता शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन मिर्झा उबेद बेग यांनी आष्टी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी केले. 

आष्टी येथील तंजी मे तरक्की शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आष्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याचे युग हे स्पर्धेचे असून या युगामध्ये जर तुम्हाला टिकायचे असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. मेहनत ,चिकाटी, एकाग्रता यांच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार जावेद पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मिर्झा हाश्मतुल्ला प्राथमिक शाळा च्या मुख्याध्यापिका नसरीन शेख, आझाद उर्दू शाळेचे उपमुख्याध्यापक सय्यद शफी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जावेद पठाण यांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले त्यांनी देखील माणूस म्हणून कसे चांगल्या पद्धतीने जगता येईल तसेच विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

 पुस्तकी न होता माणुसकीचे शिक्षण सुद्धा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सय्यद शफी, शेख नसरीन, शाळेतील सहशिक्षक संतोष सायकड, हनुमंत पोकळे ,संदेश जगताप ,अर्चना हजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील सहशिक्षक श्रीमती मंजुश्री गोरे कावळे वसीम शेख महादेव लटपटे आदींचा सत्कार करण्यात आला तसेच नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

 निरोप समारंभानंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन करून निरोप देण्यात आला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.