संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य शासना द्वारे उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी...
आ.सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती
आष्टी ( प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जनतेमध्ये क्षोभ निर्माण झालेला आहे या क्रूरकर्मी आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्यामुळे या हत्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाद्वारे सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली असून या नियुक्ती बाबत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत अशी माहिती आ. सुरेश धस यांनी दिली..
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली
अधिक माहिती देताना
आ. सुरेश धस पुढे म्हणाले की,
प्रसिद्ध फौजदारी वकील आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक गाजलेल्या हत्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शासन घडवणारे अशी ख्याती असलेले उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती होईल अशी आशा आहे.
या हत्याप्रकरणी आपण सुरुवातीलाच एसआयटी द्वारे तपास करावा अशी मागणी केली होती त्याला देखील यश आले असून मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस उप महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या प्रमुखत्वाखाली विशेष तपास यंत्रणा पथक नियुक्त केलेले आहे
तथापि, मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी त्यातील काही अधिकाऱ्यांविषयी आणि कर्मचाऱ्यांबाबत विशेषतः बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत आक्षेप असल्याचे मी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहे
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याबाबत योग्य चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला आहे करण्याचा शब्द दिला आहे.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषय नाही. हे आका मोठ्या आकांसोबत सगळीकडे होते. त्यामुळे तीच गाडी सरेंडर करताना वापरलो होती, तीच गाडी भेटीसाठीही होती. खंडणी प्रकरणी अटक झालेला वाल्मीक कराड आणि इतर आरोपी यांना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते इतर ठिकाणी संभाजीनगरमध्ये ठेवावेत. बीड जिल्ह्यातील अनेक अधिकारी या आरोपींच्या संबंधात आणि सानिध्यात असतात बीड जिल्ह्यामध्ये शासकीय आस्थापनेमध्ये प्रमाणित बिंदू नामावली तपासली असता विशिष्ट प्रवर्गातील लोक वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकांच्या जागेवर नियुक्ती करून आलेले आहेत आलेत. एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने आल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो. मी आता यांना हलवा म्हणतोय. भविष्यात ही केसचं दुसरीकडे हलवा असं म्हणेन. धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मागितला आहे काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येत नाही. ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास नकार दिलाय, त्याचं पद काढून घ्यावं, अशा आशयाच पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. अशी माहिती त्यांनी शेवटी दिली
stay connected