चिंचोलीमध्ये छापा ८६ किलो गांजा पकडला
चारचाकी वाहनातून नेणार होते विक्रीला
तेजवार्ता न्यूज नेटवर्क
Ashti : अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील चारचाकी वाहनासह ८६ किलो गांजा पकडला. ही कारवाई बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी केली. चिंचोली येथे ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल १७ लाख ७७ हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील चिंचोली येथे चारचाकी वाहनात ८६ किलो गांजा ठेवला असून तो विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यावर अंभोरा पोलिसाच्या मदतीने याठिकाणी बुधवारी सकाळी छापा टाकला. यात चारचाकी वाहनासह १७ लाख ७७ हजार ६०० रूपयांचा ८६ किलो गांजा जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमृत महादेव इथापे (वय ३१ रा. चिंचोली ता. आष्टी) याच्यावर गुन्हा दाखल करत आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलिस उपनिरीक्षक सातव, पोलिस हवालदार अशोक दुबाले, दीपक खांडेकर, बाळू सानप सोमनाथ गायकवाड, अर्जुन यादव, संजय जायभाय, गणेश हांगे , सिद्धार्थ मांजरे, शरद पोकळे यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि मंगेश साळवे करीत आहेत.
stay connected