“बीड जिल्ह्यातील गुंडगिरी,दहशतवाद संपवण्याचा निर्धार..i मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आ.सुरेश धस यांनी मानले आभार

 “बीड जिल्ह्यातील गुंडगिरी,दहशतवाद संपवण्याचा निर्धार..i
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आ.सुरेश धस यांनी मानले आभार 



आष्टी (प्रतिनिधी) 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी सभागृहामध्ये जोरदार हल्लाबोल केल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे बीड जिल्ह्यातील दहशतवाद गुंडगिरी आणि अवैध वाळू माफियांचे साम्राज्य उध्वस्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला त्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी उत्तर देताना अत्यंत स्पष्टपणे सर्व घटनाक्रम सांगितला त्यामध्ये या प्रकरणातील संशयित सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसेच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कडे सोपवण्यात येणार असून तपासामध्ये निष्पन्न होणारे आरोपी कोणतेही असो त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे या प्रकरणी तसेच बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि दहशतवाद वाटला असल्यामुळे तसेच स्व.संतोष देशमुख हत्याप्रकरणी दुर्लक्ष करण्यात आल्याचा ठपका ठेवून बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात येणार आहे असेही त्यांनी घोषित केले.

बीड जिल्ह्यामधील मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पातील अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मात्र या हत्येप्रकरणी जर वाल्मिक कराडचा हात असेल, तर त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे सांगत

बीडच्या मस्साजोगमधील प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणाची पाळेमुळे खोदून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले आहे. या हत्याप्रकरणी मास्टरमाईंड कोणीही असला तरी सोडणार नाही, बीडमध्ये शांतता प्रस्थापित करु,असेही फडणवीसांनी सांगितले.

 बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळेमुळे खोदून काढू, संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करु संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी फडणवीसांनी दिली.

त्यानंतर बोलताना माझ्या मागणीवर अत्यंत समर्पक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले,त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा असे आ.सुरेश धस यांनी म्हटले आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.