माजी आ. भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक
आष्टी ( वार्ताहर ) :-आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची चिंतन बैठक शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी आष्टी येथे होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी निवडणूकी पुर्वी प्रत्येक गांव, वाड्या, वस्त्यांवर जात संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. लोकाग्रहास्तव त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सर्व ताकदीनिशी निवडणूक लढविली. कार्यकर्त्यांनी देखील जिवाचे रान करीत जिंकण्यासाठी प्रयत्न केले परंतु अपयश आले. आपला पराभव कसा झाला, आपण कोठे कमी पडलो, प्रचारयंत्रणेत आपण कमी पडलो का ? यावर चिंतन आणि विचार मंथन करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता कार्यकर्ता चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अजयदादा धोंडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected