राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत रितेश सरोदेला विजेते पारितोषिक
_________________________________
शब्दगंध साहित्यिक परिषद तर्फे आयोजित प्रेम काव्य लेखन स्पर्धेमध्ये जि.प. कें प्रा शा वहालीचा विद्यार्थी रितेश मनोहर सरोदे याने आईचे प्रेम ही कविता लिहून उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कोहिनूर मंगल कार्यालय अहिल्यानगर येथे प्राचार्य जी.पी. ढाकणे, सुभाष लांडे, सुनील गोसावी, राजेंद्र उदागे,अशोक कानडे,भगवान राऊत, ज्ञानदेव पांडूळे या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, भेटवस्तू तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.हे विजेते पारितोषिक वडील मनोहर सरोदे सोबत स्वीकारले.रितेशने आजपर्यंत अनेक कविता. रचल्या आहेत
यासाठी रितेशला जि प कें प्रा शा वहालीचे मुख्याध्यापक बनकर सोनाजी धनराज सुरवसे,सीमा गुंड , शेख नजमा, सरोदे प्रतिक्षा,रोकडे मामाचे मार्गदर्शन लाभले.रितेशचे या यशाबद्दल आदरणीय बोंडार्डे साहेब . केंद्रप्रमुख मस्के सर,वहालीचे सरपंच अशोकदादा पवार यांनी अभिनंदन केले
stay connected