संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण...
सर्व सर्वपक्षीय मोर्चामध्ये आ.सुरेश धस होणार सहभागी...
आष्टी (प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी दि.28 डिसेंबर 2024 रोजी आयोजित बीड येथील सर्व पक्षीय मोर्चा मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत
याविषयी अधिक माहिती अशी की,
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे
या खून प्रकरणातील सर्व आरोपी आरोपी आणि सूत्रधार यांना अटक करण्यात यावी
या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर दि.28 डिसेंबर 2024 रोजी सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे
या मोर्चामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत.. नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य विधान मंडळ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार सुरेश धस यांनी या हत्येप्रकरणी अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमकपणे आणि प्रभावीपणे सभागृहामध्ये या अमानवी क्रूर पध्दतीने केलेल्या हत्येचा घटनाक्रम सांगत बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था
रसातळाला मिळवण्याचे काम गेल्या पाच वर्षात कोणी केले आहे ?
याचा शोध घेण्याची मागणी करून अत्यंत गरीब घराण्यातील सरपंचाची हत्या करून जिल्ह्यामध्ये दहशत पसरवणारे कोण आहेत ?
आणि या क्रूर हत्या करणाऱ्या गुन्हेगारांचे पाठीराखे,सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारे त्यांचे "आका " कोण आहेत ?
याचा शोध पोलीस विभागाने घ्यावा अशी मागणी केली होती..
त्या पार्श्वभूमीवर बीड येथील सर्व पक्षीय मोर्चामध्ये आ.सुरेश धस यांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून या मोर्चामध्ये ते आणखी काय गौप्यस्फोट करणार आहेत ?
या विषयी बीड जिल्ह्यातील जनतेमध्ये उत्सुकता आहे..
stay connected