आ . सुरेश धस यांची खुंटेफळ साठवण तलावास भेट
*आज खुंटेफळ साठवण तलावास आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस साहेब यांनी भेट दिली व तलावाच्या कामाचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सदर प्रकल्प आणि काळी माती खोदकामाची पाहणी केली.*
*खुंटेफळ साठवण तलावामध्ये पुनर्वसित होणाऱ्या मौजे खुंटेफळ व कुंबेफळ गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, अशी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मागणी केली. त्यानुसार ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व पुनर्वसनाबाबत समस्या सोडवून पुनर्वसनाचा मावेजा वाटप करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याना सूचना दिल्या असून उर्वरित मंजूर भूसंपादन मावेजा १५ दिवसात वाटप करण्याबाबत सूचित केले.*
*सोबतच १९० हेक्टर संपादन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले. तसेच सदर चालू असलेल्या कामामधे कोणीही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये, अशी विनंती देखील उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना केली.*
*या प्रसंगी मौजे खुंटेफळ, कुंबेफळ, सोलापुरवाडी, बाळेवाडी व पुंडी या गावांतील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
stay connected