गौणखनिजाची विनारवानगी वाहतूक करू नये - तहसीलदार वैशाली पाटील

 गौणखनिजाची विनारवानगी वाहतूक करू नये - तहसीलदार वैशाली पाटील




आष्टी ता.२५ (प्रतिनिधी)- तालुक्यातील कोणत्याही नागरिकास मुरूम, माती, दगड वाहतूक करावयाची असल्यास निर्धारित ब्रास पर्यंतची परवानगी तहसील स्तरावरून देता येते.  याकरिता सर्वसामान्य व्यक्ती महाखनिज मध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. आपल्या अर्जावर पडताळणी केलेनंतर तात्काळ महाखनिजवर चलन भरून आपणास परवानगी देता येते. याकरिता कोणत्याही एजंट अथवा दलाल यांची आवश्यकता नसून आपण कार्यालयात संपर्क साधून आपली परवानगी मिळवू शकता. जर तालुक्यात विना परवाना गौणखनिजाची वाहतूक करतांना आढळल्यास चालू बाजारभावाच्या पाच पट दंडाची आकारणी तसेच वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तालुक्यातील सर्व नागरिकांनी रितसर परवानगी घेवूनच मुरूम, माती, दगड याची वाहतूक करावी असे आष्टीचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.