मतदार संघाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही,
लोणी गावातील नागरिकांचे माझ्यावर प्रचंड विश्वासाचे नाते.
आमदार सुरेश धस .
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर अधिवेशन संपल्यावर मतदार संघातील पहिली भेट लोणी गावाला आमदार सुरेश आण्णा धस यांनी दिली. लोणी येथे नूतन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सपत्नीक पूजेसाठी आमदार सुरेश आण्णा धस व सौ. प्राजक्ताताई धस यांना पूजेचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने दिला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना हे उपस्थित होते.
लोणी येथे जवळपास 40 ते 50 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाचे आज सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या मंदिरासाठी आमदार धस यांनी दहा लक्ष रुपये त्यांच्या फंडामधून दिले.विधीवत होम हवन झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर जाहीर सभा झाली. पहिल्याच
सभेमध्ये आमदार सुरेश आण्णा धस यांनी कोणावरही टीका न करता भविष्यामध्ये फक्त विकासाचे राजकारण करणार आहे अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. लोणी गाव हे नेहमी माझ्याबरोबर राहिलेल्या आहे या निवडणुकीत सुद्धा मला सर्व बाजूंनी घेरलेले लक्षात आल्यामुळे गावातील इतर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून मला 1462 मते मिळवून दिली. या लोणी गावातील मतदारांच्या विश्वासाला मी पात्र राहण्याचा सदैव प्रयत्न करणार आहे. गावाच्या बाजूने सर्वच रस्त्यांची झालेली दुर्दशा आता संपवणार आहे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिट,डांबरीकरण करून मजबूत करण्यात येतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आपले स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे विकासाचे कोणतेही काम करताना अडचण येणार नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पहिल्याच अधिवेशनामध्ये शिंपोरा ते खुंटेफळ तलावा मध्ये येणाऱ्या पाईपलाईन साठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करून घेतली आहे. याप्रसंगी आपल्या भाषणामध्ये आमदार धस यांनी सांगितले की लोणी परिसरामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी सीना नदी मधून खुंटेफळ, (वाटेफळ) लोणी या तलावामध्ये पाईपलाईन द्वारे पाणी आणून टाकण्यात येईल. भातोडी तलावातून वाहून जाणारे पाणी लोणीच्या पाटबंधारे तलावा मध्ये आणून टाकण्यासाठी पाटाचे काँक्रिटीकरण करून देईल. त्याचप्रमाणे गावातील हनुमान मंदिराच्या नूतन बांधकामासाठी माझ्या फंडातील पहिली सही 25 लक्ष रुपयांची लोणी साठी राहील ,असाही शब्द आमदार सुरेश धस यांनी ग्रामस्थांना दिला.
याप्रसंगी लोणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते परंतु सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाल्यामुळे मी सत्कार घेणार नाही असे अण्णांनी स्पष्ट सांगितले.
त्याचप्रमाणे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत मी प्रयत्नशील राहणार आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम समितीच्या वतीने आमदार सुरेश धस यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व दत्तात्रेयांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली.
याप्रसंगी लोणी गटातील श्री. ह भ प रामदास महाराज रक्ताटे, ह भ प अभिजीत महाराज निंबाळकर, ह भ प नारायण महाराज वाळके, ह भ प बाबा महाराज वाळके, श्री. उद्धव बापू दरेकर,मा. उपसभापती गोपाळ भाऊ रक्ताटे, शिवाजी पाटील वाळके, मोहन तात्या वाळके, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष वाळके, गणप्रमुख रामदास अण्णा शेंडगे ,महबूब भाई जवान, श्री राजेंद्र चोभे ,श्री सोमनाथ वाळके, उद्धव पाटील मोडवे ,श्री संजय गुंड, अमोल गुंड, उध्दव पाटील वाळके,जयसिंग गव्हाणे,ह भ प बाळासाहेब बोडरे सर, सरपंच श्री ज्ञानदेव सासवडे सर,संजय रकताटे,बाळासाहेब कावरे, गण प्रमुख श्री राहुल सुरवसे, श्री जालिंदर चांदगुडे नेते, रेनकू आण्णा बेल्हेकर, भवर सर सरपंच,मा.सरपंच श्री.बाजीराव वाळके, सुभाष दादा भोसले,दादा शिंदे,सरपंच राजेंद्र खुरंगे, श्री शरद माखनकर,निवृत्त कर्नल बापूराव पवार,सोमनाथ बेल्हेकर, कृष्णा पवार,विशाल सासवडे,प्रवीण सासवडे,अविनाश खोमणे,मल्हारी भोसले,लोणी ग्रामपंचायत चे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार श्री राजेंद्र (आबा) वाळके यांनी मानले.तर ह भ प रामदास महाराज रक्ताटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी महंत ह भ प श्री. ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
किर्तन सेवेनंतर महाप्रसादाची पंगत लोणी स .श्री. बाजीराव विठोबा वाळके पाटील यांच्या वतीने देण्यात आली.
याप्रसंगी आमदार सुरेश आण्णा धस आमदार झाल्यानंतर मतदार संघात पहिल्यांदाच लोणी या गावी भेट दिल्यामुळे त्यांची ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात,फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य मिरवणूक काढली होती.
stay connected