बेलगाव येथे रेणुकाई देवीची यात्रा संपन्न
*****************************
निसर्गरम्य वातावरणात भव्य कुस्त्यांचा आखाडा;भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी
*****************************
*****************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील जागृत देवस्थान असलेले आराध्य दैवत श्री रेणुकाई मातेचा पौर्णिमेला दत्तजयंती दिवशी यात्रा मोठया उत्साहात साजरी झाली. तीन दिवस हा यात्रा महोत्सव चालतो.पहिल्या दिवशी विधीवत पौर्णिमेदिवशी देवीची पालखी छबिना मिरवणूक,ऑर्केस्ट्रा, दुसऱ्या दिवशी भव्य मल्लाचा हंगाम भरला या हंगामाला महाराष्ट्रातुन नामांकित मल्ल हजेरी लावली होती.हा हंगाम व यात्रा बेलगाव परिसरातील अठेगावपुठ्यात प्रसिध्द आहे.तिसऱ्या दिवशी यात्रा गावात भरते.यात्रेच्या दरम्यान देवीचा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजून केला होता.
यावर्षी रेणुकाईमाता देवस्थानला "ब" दर्जा प्राप्त झाल्याने आणि माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या विशेष प्रयत्नाने ४ कोटी ९० लक्ष रुपयांचा भरघोस निधी मिळाल्याने देवस्थान परिसरात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून देवस्थानचा कायापालट पाहायला मिळाला असल्याने भाविकांनी यावेळी होत असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता तिचेच उपपीठ म्हणून बेलगावच्या रेणुकादेवीचे ओळख आहे.महाराष्ट्रातील व बेलगाव ग्रामस्तांची ही कुलदेवता आहे.
रेणुका देवीला यात्रेनिमित्त विशेष साज,श्रृंगार चढवला जातो.सोन्याचे दागिणे आणि अलंकार देवीला चढविण्यात आले होते.दागिण्यांनी सजलेल्या रेणुका देवीचं नयन मनोहरी रुप प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासारखे होते.
शिखरावर चढत असताना दोन्ही बाजूने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. बेलफुल, पेढा तसेच रेणुका आईला नऊवारी साडी, बांगडी, खेळणे,राहड गाडगे,तसेच विविध वस्तूंची दुकानांनी यात्रा सजली होती.
नदीच्या गाठी वसलेल्या या निसर्गरम्य वातावरणातील या मंदिराजवळील भव्य कुस्त्यांचा आखाडा भरला होता.
stay connected