ऊस तोडणी कामगारांना देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कम व्यवहाराला कायद्याचे संरक्षण देण्यात यावे
-- आ.सुरेश धस
मा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषा वरील आभार आणि राज्य सरकारचे अभिनंदन प्रस्तावावर बोलताना केली मागणी
आष्टी (प्रतिनिधी)
साखर कारखाना व्यवस्थापन ऊसतोड कामगार कामगारांना अग्रीम उचल रक्कम देतात मात्र त्यासाठी वाहतूकदार आणि मुकादम यांना जबाबदार ठरवून त्यांच्याकडून कायदेशीर दस्तऐवज करून घेतात मात्र ऊस तोडणी कामगारातील काही कामगार हे कामाला न जाता अग्रीम रक्कम इतरत्र खर्च करतात ही रक्कम परत मिळवणे सहजासहजी शक्य होत नाही त्यातून अनेक पेज प्रसंग निर्माण होत असल्यामुळे अनेक मुकादमांनी वाहतूकदारांनी आत्महत्या केलेले आहेत त्यामुळे या उचल रकमे च्या व्यवहारास कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी अशासकीय विधेयक मांडणार आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषण वर आभार व्यक्त करताना आणि राज्य सरकारच्या अभिनंदन प्रस्तावा प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,जेव्हा विरोधकांचे " दिल के टूकडे हजार हुये कोई यहा गिरा कोई वहा गीरा "
अशी अवस्था झाली म्हणून आता त्यांनी जनतेला मारकडवाडी दाखविण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीमध्ये 31 खासदार निवडून आले त्यावेळी त्यांनी ईव्हीएमला आक्षेप घेतला नाही आले मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्या वेळी त्यांनी ईव्हीएमला दोष देण्याचे काम सुरू केले आहे हे रडगाणे असून दुर्दैवी असल्याचे सांगत आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांनी पंतप्रधान आवास योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्हीसाठी घसघशीत वाढ केल्यामुळे गोरगरिबांची घरे तयार होणार असून त्यातून निवारा मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी हा शेतकऱ्यांना मोठा आधार असून त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे जलजीवन मिशन अंतर्गत 90% योजना पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असून त्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा म्हणजे उर्वरित कामे पूर्ण करून लोकांना प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी मिळणार आहे ही केंद्र आणि राज्य सरकारची मोठी उपलब्ध ठरणार आहे असे सांगत केंद्र आणि राज्य सरकारने आजपर्यंत राबविलेल्या विविध योजना आणि त्याचा सामान्य जनतेला झालेला फायदा याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहुमताने महायुती सरकारला पसंती दिली असल्याचे सांगत पश्चिम वाहिनीचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात लवकरात लवकर यावे आणि मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यात यावा अशी मागणी करीत त्यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन केले. तसेच, सर्व शासकीय कामकाज आणि व्यवहार मराठी भाषेतूनच व्हावा, अशी मागणी केली.मनरेगा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही थेट त्याच्या खात्यात जमा करण्याची आवश्यकता आ.धस यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाला सरकारकडून परवानगी दिल्याबद्दल अभिनंदन केले.यासह आदी योजनांची अभ्यासपूर्ण केलेली मांडणी यावर सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्यांना प्रतिसाद दिला... सभागृहात अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करत सरकारच्या निर्णयांचे स्वागत करून त्यांच्या कार्याची प्रशंसा आ.सुरेश धस यांनी केली.
stay connected