शासकीय अधिकारी,कर्मचारी सरपंच यांनी जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी सकारात्मक रहावे..
आ.सुरेश धस यांनी व्यक्त केली अपेक्षा..
आष्टी (प्रतिनिधी)
ज्या शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या हिताची कामे करण्याचा कंटाळा न ठेवता शासनाच्या योजनांची माहिती देण्यात तत्परता दाखवावी अशी अपेक्षा सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे
मात्र ज्यांना जनतेच्या हिताची ही कामे करावयाचे नसतील त्यांनी इतरत्र बदली करून जावे असा इशाराही आ.सुरेश धस यांनी दिला आहे.. आष्टी,पाटोदा, शिरूर (कासार) विधानसभा मतदारसंघातील.. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील संघटनेचे सदस्य सरपंच,उपसरपंच,तसेच
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक संघटना,, ग्रामरोजगार सेवक संघटना, व कृषी विभाग अधिकारी-कर्मचारी संघटना यांनी आयोजित केलेली संयुक्त “संवाद बैठक” आज आष्टी येथे संपन्न झाली..
त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की,
ए.आर.अंतुले साहेबांनंतर सरपंचांची बाजू खंबीरपणे मांडणारे आणि समोर आलेले प्रश्न अभ्यासू वृत्तीने न्यायिक पद्धतीने सोडवणारे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचाची थेट निवडणूक करण्याचा क्रांतिकारी निर्णय फडणवीस साहेब यांनीच घेतला.यामुळे चांगल्या माणसांना गाव खेड्यात काम करण्याची संधी मिळत आहे. सरपंचांनी देखील प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून काम केले पाहिजे.
गावचे प्रथम नागरिक या नात्याने सर्व सरपंच, उपसरपंच आदींनी शासनाच्या नवनवीन योजना माहिती करून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.त्यासाठी वाचन संस्कृती अंगीकृत करणे आवश्यक आहे.त्यामुळे शासनाच्या नवनवीन योजना,शासकीय नियमावली समजण्यास सोपे जाते.नमो योजना,शबरी योजना या योजना लोकसंख्या विचारात घेऊन राबविल्या पाहिजे. यासाठी नवीन जीआर काढण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत,राज्याचे नेतृत्व हे सकारात्मक आणि कल्पक माणसाच्या हातात आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचे काम करावे 10 निर्णय घ्या पैकी काही चुकतील परंतु जो चुकेल तोच काम करेल हे मला कळतंय त्यामुळे काम करत रहा असे सांगत आ.धस म्हणाले की,सीना मेहकरी,खुंटेफळ साठवण योजना हा फकड्याच पूर्ण करणार आहे..
ज्या योजनेसाठी ग्रामस्थांकडून दगड गोटे खाल्ले ज्या योजनेची सुरुवात मी केली त्या सीना मेहकरी आणि खुंटेफळ साठवण तलावाची योजना लवकरच पूर्ण होणार असल्याचे यावेळी धस म्हणाले.या संवाद बैठकीला सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, गटविकासधिकारी आष्टी सचिन सानप , गटविकास अधिकारी पाटोदा बागलाने,आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, पाटोदा तालुका कृषी अधिकारी पवार,शिरूर का.तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन राऊत, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष सुधीर पठाडे, सरपंच संदिप खटाळ, सरपंच युवराज पाटील, रोजगार सेवक संघटना महा.राज्य हनुमंत पोठरे, रोजगार सेवक संघटनेचे आंदुरे, आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेचे प्रमुख लोंढे, पाटोदा तालुका ग्रामसेवक संघटना प्रमुख नागरगोजे,ग्रामसेवक संघटना शिरूर का. अशोक मिसाळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना,डी.एन.ई.-१३६,कृषी विभाग,ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आष्टी-पाटोदा-शिरूर कासारचे बहुसंख्य पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य आदी उपस्थित होते.
stay connected