आष्टीत उद्या होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - परमेश्वर शेळके

 आष्टीत उद्या होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - परमेश्वर शेळके




आष्टी। प्रतिनिधी 

महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ उद्या शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा होणार असून सर्वांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, शिरूर तालुकाध्यक्ष दिपक खोले यांनी केले आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने महेबुब शेख यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची आष्टी येथे शनिवारी दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार आहे. आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, युवक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, शिरूर तालुकाध्यक्ष दिपक खोले यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.