*मा.महेबुबभाई शेख यांचा गाव भेट संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*तेजवार्ता प्रतिनिधी कासम शेख दौलावडगाव*
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची होत असून २३१ आष्टी मतदार संघाचे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.महेबूबभाई इब्राहीम शेख यांच्या प्रचारार्थ ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दौलावडगाव गटातील सावरगाव,शेडाळा,घाट देऊळगाव,लमणतांडा, चिचेवाडी,अरणविहरा हरेवाडी मराठवाडी बांदखेल केळ पिंपळगाव घाट कारखेल साले वडगाव अंभोरा इत्यादी सर्व गावांना गाव भेट संवाद दौऱ्याला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीमत्व आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील माणूस म्हणून श्री महेबुब भाई शेख यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामस्थांनी आदराने त्यांचे स्वागत केले हे सदैव स्मरणात राहील, आपल्या सर्वांचे सहकार्य असेच पाठशी राहु देत, आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आष्टी - पाटोदा- शिरूर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन महेबुब भाई यांनी मतदारांना केले.
यावेळी आष्टी तालुक्यातील श्री परमेश्वर काका शेळके तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी नेते श्री सुनील दादा नाथ, श्री रवींद्र ढोबळे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष, श्री संदीप हाडे शिवसेना ता.उपप्रमुख, ज्ञानेश्वर मुटकुळे शिवसेना, श्री विजू गाढवे, राहुल काकडे,शौकत पठाण, रा.काॅं.पा.आष्टी तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, शिवाजी परभणे पाटील, सतीश चौधरी, ज्ञानेश्वर कासवत यांची प्रमुख उपस्थिती लाभली,दौलावडगावचे मा.सरपंच मेहमूद शेख,ग्राम.पं.सद्स.महादेव कोहक, सागर फसले,आसाराम कोहक, अरबाज खान, जालिंदर मुळे,ग्राम.पं.सदस्य मिरा मामु , गफार पटेल, पापामिया पटेल, मोईन खान,खंडू अप्पा इथापे, दादा टेलर,राजू फसले,नवाब शेठ,शौकत मेजर,जैनूद्दीन मेजर, इक्बाल मेजर , मोहसिन कुरेशी,प्रदीप पिसोरे, सचिन कोहक, रोहिदास आडबल्ले, पत्रकार बंधू जावेद सय्यद आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected