प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई - उपविभागीय अधिकारी वसिमा शेख

 प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई - उपविभागीय अधिकारी वसिमा शेख

------------------------------------------


 

------------------------------------------

आष्टी(प्रतिनिधी)

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आष्टी २३१ विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी ,कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसिमा शेख यांनी दिला आहे.

         आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालयामध्ये शनिवार दि.२६ आक्टोबर रोजी प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आष्टीच्या तहसिलदार   वैशाली पाटील,तहसिलदार दत्तात्रय निलावाड,नायब तहसिलदार बाळदत्त मोरे,नायब तहसिलदार प्रकाश सिरसेवाड,नायब तहसिलदार शिवनाथ खेडकर, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे उपस्थित होते.यावेळी मतदान कर्तव्यावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रथम प्रशिक्षण देण्यात आले.आष्टीमधील प्रशिक्षणासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २ हजार ३०० इतकी आहे. यापैकी आज १ हजार १५० अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.  उद्या दि.२७ रविवारी १ हजार १५० अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आज शनिवार दि.२६ आक्टोबर  रोजी जे कर्मचारी प्रशिक्षणासाठी गैरहजर होते.या गैरहजर कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम १३४ नुसार कारवाई करण्याचे सूतोवाच निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी केले.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील यांनी प्रशिक्षणासाठी जे अधिकारी,कर्मचारी नियुक्त केले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.