राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुर्डी गणप्रमुखपदी सोमिनाथ सानप यांची नियुक्ती
तुतारीकडे युवकांची मोठ्या संख्येने ओढ...
आष्टी। प्रतिनिधी
तालुक्यातील तुतारी मध्ये युवक शरदचंद्र पवार यांच्या विचारांधारावर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने येत असून याच अनुषंगाने सुर्डी येथील युवा नेते सोमिनाथ सानप यांनी प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुर्डी गणप्रमुखपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल काकडे व अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख यांच्या हस्ते रविवार दि २७ ऑक्टोबर रोजी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते तथा युवा नेते सोमिनाथ सानप यांच्या सुर्डी गुणांमध्ये सामाजिक कार्य करत असून त्यांची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दखल घेतली असून त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल काकडे, डॉ अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख यांच्या हस्ते सोमिनाथ सानप यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी अल्पसंख्याक विभागाचे आष्टी शहराध्यक्ष जिशान सय्यद, तोफीक शेख, अदनान सय्यद, अरबाज कुरेशी, सचिन पवार,आकाश गर्जे, बबन गर्जे, सुनील गर्जे, अजिनाथ साबळे, बबन कांबळे, भाऊसाहेब कांबळे, राहुल कांबळे, सतीश, अजित आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
stay connected