आष्टी व कडा या ठिकाणी पोलिसांचे पथसंंचलन
कडा ( प्रतिनिधी ) - दिवाळी सण आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने आष्टी , कडा या ठिकाणी पोलिसांचे पथसंंचलन झाले .
याबाबत अधिक माहिती अशी की पुढील आठवड्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होत . त्याचप्रमाणे सध्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांच्या वतीने पथसंंचालनाचे आयोजन करण्यात येते. शनिवारी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी , कडा , आंधळेवाडी आणि शिराळ या ठिकाणी पोलिसांचे पथसंंचलन झाले . यावेळी आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलिसांबरोबरच सीमा सुरक्षा दलाचे पोलीसही यामध्ये सहभागी झाले होते . ए पी आय विक्रांत हिंगे , विजय नरवाडे , पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे , सीमा सुरक्षा दलाचे पी एस आय रतन सिंग , रोहिताश कुमार यांच्यासह आष्टी पोलिस ठाण्याचे 35 पोलिस व बीएसएफ ची 447 बटालियन अल्फा कंपनीचे जवान सहभागी झाले होते . कंपनी कमांडर एसी राम कुमार व आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथ संचलन झाले .
stay connected