आष्टी पाटोदा शिरूर मध्ये महेबुब शेख च्या हाती तुतारी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आज 45 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये आष्टी मतदार संघातून मेहबूब शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 45 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये राहुरी मतदार संघातून प्राजक्त तनपुरे इस्लामपूर मतदारसंघातून स्वतः जयंत पाटील कर्जत जामखेड मतदार संघातून रोहित पवार घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रताप ढाकणे तर पारनेर विधानसभा मतदार संघातून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
stay connected