आष्टी वकील संघाच्या
अध्यक्षपदी अजय जेवे विजयी
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत अजय नाना जेवे हे 75 मते घेऊन विजयी झाले, तर उपाध्यक्षपदी किशोर कल्याण निकाळजे, सचिवपदी यासीर ताहेर सय्यद, कोषाध्यक्षपदी संदीप रावसाहेब जगताप व महिला प्रतिनिधीपदी अर्चना चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आष्टी वकील संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व महिला प्रतिनिधी यांची बिनविरोध निवड ता. 17 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी अजय नाना जेवे, बाळासाहेब महादेव झांबरे व संभाजी मोहन दहातोंडे हे तीन उमेदवार रिंगणात होते. आज (ता. 22) मतदान पार होऊन 147 पैकी एकूण 144 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी झाली. त्यात अजय जेवे यांना 75 मते मिळून ते विजयी झाले. बाळासाहेब झांबरे यांना 45, तर संभाजी दहातोंडे यांना 24 मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. एम. एस. झांजे व अॅड. बापूराव गर्जे यांनी काम पाहिले.
stay connected