राज्यस्तरीय मैत्रा काव्य महोत्सवात जि प कें प्रा शा वहाली विद्यार्थ्यांचे सादरीकरण
_____________________________
मैत्रा फाउंडेशन आयोजित राज्य स्तरीय बालकविसंमेलनात जि प कें प्रा शा वहाली च्या शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केल्या.तसेच शाळेतील शिक्षिका शेख नजमा मैनुद्दीन यांनी पण घात तिचा कविता सादरीकरण केली.जिल्ह्यातील एकमेव शाळा होती की जिचे 10 विद्यार्थ्यांनी बालकविसंमेलनात सहभाग झाले.सिद्धी मानमोडे,अरशान सय्यद, रितेश सरोदे,स्वप्नाली सरोदे, ऋतुजा सरोदे, दिव्या सोनवणे,समाधान थोरवे, अपेक्षा मानमोडे,सान्वी सरोदे, आदिती सरोदे यांनी उत्कृष्ट कविता सादरीकरण केल्या.उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.विदयार्थ्यांनी खूप छान कविता सादरीकरण केले.न घाबरता धाडसाने विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर कविता सादरीकरण केले.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सोनाजी बनकर सर ,सुरवसे धनराज सर,सुरवसे सीमा मॅडम ,शेख नजमा मॅडम ,सरोदे मॅडम आणि रोकडे मामा या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.राज्यस्तरीय व्यासपीठावर अभिव्यक्ती संधी विद्यार्थ्यांना मिळाली.हा राज्य स्तरीय उपक्रमात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मैत्रा फाउंडेशन चे अध्यक्ष द.ल.वारे सर,समीर सय्यद सर केंद्रप्रमुख मस्के सर,वहाली गावचे सरपंच अशोकदादा पवार, शा. व्य. समिती अध्यक्ष सरोदे युवराज उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांनी अभिनंदन केले.
stay connected