आष्टी तालुका आम आदमी पार्टी अध्यक्ष डॉ. महेश नाथ यांचा राजीनामा

 *आष्टी तालुका आम आदमी पार्टी अध्यक्ष डॉ. महेश नाथ यांचा राजीनामा*





आष्टी: आष्टी तालुक्याचे आम आदमी पार्टी अध्यक्ष डॉ. महेश नाथ यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण म्हणून त्यांनी वाढत्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांगितल्या आहेत.




डॉ. नाथ यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे की, गेल्या काही काळात त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि समाजसेवेसाठी काम केले आहे,ह्या संधीबद्दल ते  अत्यंत आभारी आहेत. तथापि, सध्या त्यांच्या दंतचिकित्सक व्यवसायाच्या वाढत्या मागण्यांमुळे त्यांना पक्षाच्या कामासाठी आवश्यक वेळ आणि श्रम देणे शक्य होत नाही.




डॉ. नाथ यांनी पक्षाच्या निवडणूक धोरणावर देखील भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाने महाराष्ट्रात अद्याप एकही निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणुका न लढवल्यास पक्षाच्या वाढीची शक्यता कमी आहे. त्यांनी नमूद केले की, चांगले काम करणाऱ्यांना टाळले जात आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे पक्षाच्या वाढीवर मर्यादा येत आहेत.





त्यांनी  असेही म्हटले आहे की, पक्षाच्या यापुढील वाढीची कोणतीही स्पष्ट दिशा नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. "विनाकारण काम करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा कोणत्या दुसऱ्या चांगल्या सामाजिक अथवा राजकीय कामांमध्ये वेळ दिला तर योग्य राहील," असेही त्यांनी म्हटले आहे.




डॉ. महेश नाथ यांनी त्यांच्या राजीनाम्याद्वारे आपल्या पदाचा त्याग करत असताना, पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.