राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी रेश्मा जगताप यांची नियुक्ती
आष्टी। प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने मुंबई येथे खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रेश्मा जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. आष्टी तालुक्यातील मूळ पाटण सांगवी येथील रहिवासी सध्या पनवेल व अहमदनगर येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तथा नागरिक व महिलांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणा-या अडीअडचणीत साथ देणा-या रेश्मा जगताप यांची ओळख असून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची व कामांची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील व खा सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांची मुंबई येथे दि.२० ऑक्टोबर रोजी पक्षाच्या सर्वेसर्वा नेत्या खा सुप्रिया सुळे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. आपण देशाचे नेते शरदचंद्र पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ,खा सुप्रिया सुळे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबुत व बळकट करण्यासाठी महिलांचे व विविध घटकांतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त प्रदेश सचिव रेश्मा जगताप यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय,सामाजिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
stay connected