वयाच्या ८५ व्या.वर्षी श्रीमती रंगुबाई बोडखे यांची अध्यात्मनिष्ठा कायम !

 वयाच्या ८५ व्या.वर्षी श्रीमती रंगुबाई बोडखे यांची अध्यात्मनिष्ठा कायम!


----------------------------------------

कोजागिरीनिमित्त माहेरच्या भोन्याई देवीची मनःपूर्वक केली पूजा

---------------------------------------



---------------------------------------

आष्टी (प्रतिनिधी)

वयाच्या ८५ व्या.वर्षीसुद्धा आणि विशेष म्हणजे दोन  महिन्यापुर्वी अत्यंत क्रिटिकल शस्त्रक्रिया होऊ नये प्रचंड अध्यात्म निष्ठेच्या जोरावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने माहेरच्या आष्टी या गावी देवीची मनःपूर्वक पूजा करून समाधान मानणाऱ्या श्रीमती रंगुबाई लक्ष्मणराव बोडखे यांच्या अध्यात्म निष्ठेविषयी विशेष कौतुकाने पाहिले जात आहेत.



महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथील शहर गाव वाड्यावर त्यासह तांड्यावर अत्यंत पवित्र भावनेने अध्यात्मक दृष्टिकोनातून विविध देवदेवतांची मनोभावे पूजा केली जाते. केवळ निष्ठेमुळे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. महिला वर्गातून परमार्थ भक्तीची ओढ अधिक दिसून येते.बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील जेष्ठ  पत्रकार तथा झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या आई श्रीमती रंगुबाई लक्ष्मणराव बोडखे या ८५ वर्षाच्या आहेत. त्यांची दोन महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया पार पडली. सर्वांच्या आशीर्वादाने त्या  सध्या आनंदी जीवन जगत आहेत.अनेकांनी शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रत्यक्ष बोडखे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सदिच्छा देत आहेत.



रंगुबाई बोडखे यांनी काल कोजागिरी पौर्णिमेच्यानिमित्ताने आपल्या माहेरच्या गावी जाऊन तेथील भोन्याई या देवीची पूजा अत्यंत मनोभावे केली.इतक्या वृद्ध अवस्थेत सुद्धा ईश्वरावर श्रद्धा असल्यानंतर मनुष्य अत्यंत श्रद्धा भावभक्तीने देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आनंदी आणि समाधानाची जीवन जगू शकतो हे यानिमित्ताने श्रीमती रंगुबाई बोडखे  यांच्या या अध्यात्म निष्ठेने आधोरेखीत केले आहे.

-------------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.