आष्टी वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ऍड किशोर निकाळजे सचिवपदी यासिर ताहेर सय्यद कोषाध्यक्षपदी ऍड संदीप जगताप तर महिला प्रतिनिधी पदी ऍड अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड
आष्टी प्रतिनिधी :- आष्टी वकील संघाची दर सालाबादाप्रमाणे सन 2024-25 या वर्षाकरिता निवडणूक जाहीर झाली होती. अध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज आले होते. सचिव पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. कोषाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. महिला प्रतिनिधी साठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दिनांक 17 आक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची शेवट चा दिवस असल्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारा पैकी दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे उपाध्यक्ष पदी ऍड किशोर कल्याण निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे सचिव पदासाठी चार उमेदवार अर्जा पैकी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे ऍड यासिर ताहेर सय्यद यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदासाठी दोन उमेद वारी अर्जा पैकी एकाने उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे ऍड संदीप रावसाहेब जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी या पदासाठी दोन उमेदवारी अर्जापैकी एक उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे ऍड अर्चना चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्जा पैकी एकाने उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे. अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज राहिले असल्याने काटेकी टक्कर होणार असल्याचे वकील संघात चर्चा होताना दिसत आहे. अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार ऍड अजय नाना जेवे, ऍड बाळासाहेब महादेव झांबरे, ऍड संभाजी मोहन दहातोंडे यांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांनी प्रचारला सुरवात केली असून कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आष्टी वकील संघाच्या अध्यक्ष पदाचे मतदान दिनांक 22 आक्टोबर रोजी होणार असून त्याच दिवशी अध्यक्ष पदाचा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड एम. एस झांजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऍड बाप्पुराव गर्जे यांनी माहिती दिली.
stay connected