कृषिरत्न बाबासाहेब पिसोरे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार
- आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब पिसोरे यांना नुकताच कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार मुंबई येथे शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला. दौला वडगाव सारख्या छोट्या गावातील बाबासाहेब पिसोरे यांनी गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे संपुर्ण राज्यात नावलौकिक केल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी सत्काराच्या कार्यक्रमास आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्रसंगी कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तहसीलदार वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार, जि. प. सदस्य सतीश शिंदे, चेअरमन राजेश धोंडे, जि. प. सदस्य वर्षा माळी, पं. स. सदस्य रमेश तांदळे, गटविकास अधिकारी सचिन सानप, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, सभापती रमजान तांबोळी, प्रा. अनंत हंबर्डे, शाम भैय्या धस, दिनकर महाराज तांदळे, नवनाथ तांदळे, अमोल तरटे, नवनाथ तांदळे, कृषी अधिकारी संदीप चाकणे, कृषी सहायक सचिन जाधव व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दौलावडगाव येथील हनुमान मंदिरात रविवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
stay connected