मुस्लिम बांधवांचा प्रचंड मेळाव्यात मा. आ.भिमराव धोंडे यांना एकमुखी पाठिंबा राजकीय जिवनात प्रथमच घेतलेल्या मुस्लिम मेळाव्यास मोठा प्रतिसाद

 मुस्लिम बांधवांचा प्रचंड मेळाव्यात मा.  आ.भिमराव धोंडे यांना एकमुखी पाठिंबा 


राजकीय जिवनात प्रथमच घेतलेल्या मुस्लिम मेळाव्यास मोठा प्रतिसाद 




आष्टी प्रतिनिधी 


आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रचंड मेळाव्यात मुस्लिम बांधवांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांना एकमुखी पाठिंबा दिला. माझ्या राजकीय जिवनात मी प्रथमच मुस्लिम बांधवांचा मेळावा घेतला असून एवढ्या प्रचंड संख्येने बांधव उपस्थित आहेत. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. माझ्या राजकारणात मतदारसंघातील दुसरी पिढी मला साथ  देत आहे याचा मला अभिमान वाटतो. मी आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मतदारसंघाचा विकास केला आहे असे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी मेळाव्यात बोलताना केले.

        आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आष्टी येथे मतदारसंघातील अल्पसंख्याक (मुस्लिम) समाज बांधवांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती नियामत बेग होते.



         पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मिरावली पहाडावर मी माझ्या आईसोबत लहानपणी दर्शनासाठी जात होतो. माझी आई देवी निमगाव येथेही  दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी जात होती.  मी आठ वर्षांपूर्वी देवी निमगाव येथे मोठा दर्गा बांधला आहे. माजी सभापती नियामत बेग यांना मीच उर्दू शाळा सुरू करून दिली आहे तसेच पाटोदा येथे ही उर्दू हायस्कूल सुरू केले आहे. त्याचप्रमाणे माझे मित्र स्व. निजाम पटेल यांचे नाव मेहेकरी येथील शाळेला दिले आहे.  लोणी येथेही सय्यदमीर बाबा यांचे शाळेला नाव दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांनाही वेळोवेळी सहकार्य केल्याने त्यांनी कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवला.  आमच्या संस्थेत आठ टक्के मुस्लिम बांधव कर्मचारी आहेत. मी विकास कामे करताना कोणत्याही कामात कधीच कमिशन घेतले नाही‌ भविष्यातही घेणार नाही. अनेक मुस्लिम बांधव परिस्थितीने आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्यावे व मोठे करावे, शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. शिकण्यासाठी  शिष्यवृत्ती मिळते याचा लाभ घ्यावा. मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी मला आपण साथ द्यावी असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेवटी केले. मेळाव्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य नाशिर पठाण यांनी कार्यकर्त्यांसह माजी आमदार भीमराव यांच्या गटात प्रवेश केला‌.  यावेळी मौलाना अब्दुलभाई यांनी सांगितले की,सर्वसामान्य कुटुंबातील नियामत बेग यांना जि.प. सदस्य करुन सभापती बनविले, सईद चाऊस यांना वेळोवेळी सर्व प्रकारचे सहकार्य करीत महाराष्ट्र केसरी पर्यंत पाठविले, सादिक कूरेशी यांना पं. स. सदस्य केले, जिल्ह्याला सर्व प्रथम शिक्षण सभापतीपद देण्याचे काम माजी आमदार धोंडे यांनी केले.

यावेळी युवा नेते अजयदादा धोंडे, जेष्ठ नेते इकबालभाई पेंटर, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,सय्यद शहाबुद्दीन,शाहिद कादरी,डॉ. मुश्ताक शेख व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमास युवा नेते अजयदादा धोंडे, 

माजी सभापती साहेबराव म्हस्के,जि. प. सदस्या वर्षा माळी, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, अभयराजे धोंडे, शंकरराव देशमुख, माजी जि. प. सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे,  अशोक सव्वाशे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, दिलीपराव म्हस्के, माजी सभापती सुवर्णाताई लांबरुंड, माजी सरपंच बाळासाहेब पवार, काकासाहेब लांबरुंड, किशोर खोले, माजी जि. प. सदस्य सतिश झगडे,माजी सरपंच चंद्रशेखर साके,माजी पं. स. सदस्य संजय धायगुडे, बाबुराव कदम,जमीर पठाण,ॲड. सय्यद अशरफ, आस्तकाभाई शेख,खालिद भाई शेख,नवनाथ सानप,बाजीराव वाल्हेकर, शेरखान पठाण, कलीम पठाण, खुर्षीद सर, फय्युम पठाण, रघुनाथ शिंदे,आदम पठाण,निजाम बेग, जाऊभाई शेख, जमील शेख, चांदभाई कारेगाव वाले, सलीम चाऊस, इस्माईल पठाण, दिलावर पठाण,माजी सभापती अनिल जायभाय, महेबुबभाई,राजपाल शेंडगे, मोहम्मद हसन चाऊस, शेरखान पठाण, रिजवान बिल्डर, कुप्पा शेख, , सरपंच दादासाहेब जगताप,सय्यद वाजेद फौजी, सय्यद मतीन,असलम पठाण, मोमीन शेख, अन्सार कुरेशी,हादी शेख, अज्जुभाई शेख, निसार सय्यद, मौलाना गुलाम हापीज, मौलाना अब्दुल हाजी, अख्तरभाई, निसारभाई सौदागर, सय्यद साजिद, इस्माईल तांबोळी, सलमान पठाण, हमीदभाई शेख, मोहसिन कुरेशी,बाबुलाल पठाण, निजामभाई शेख, डॉ. अकिल, मोहंमद करदुस, राजु भाई शेख, गुलाब शेख, अमर शेख, मौलाना हबीब, अय्यास कुरेशी, अल्ताफ सय्यद, देविदास शेंडगे, आदेश निमोणकर यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. विनोद ढोबळे व प्रा. खेमगर यांनी केले व उपस्थित त्याचे आभार अज्जुभाई  शेख यांनी मानले.


  

पाटोदा येथील जेष्ठ नेते इकबालभाई पेंटर यांना  भाषण करताना  खोकला आला. त्यावेळी  माजी आमदार भीमराव धोंडे यांनी स्वतः उठून त्यांना  पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली. याबाबत मी एवढा मोठा आहे त्यांना उठून पाणी कसे देऊ असे जराही माजी आमदार असल्याचे भासवू दिले नाही. त्यामुळे उपस्थित मुस्लिम बांधवांमध्ये  एकच चर्चा होती ती म्हणजे  धोंडे साहेबांना  मोठेपणाचा अजिबात गर्व नाही.


  

आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक युवा कार्यकर्ते आणि जेष्ठ कार्यकर्ते यांनी माजी आ. भीमराव धोंडे व युवा नेते अजयदादा धोंडे यांचा सत्कार केला तर सत्काराचा कार्यक्रम जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू होता. मुस्लिम बांधवांच्या उत्साहामुळे मा.आ. भीमराव धोंडे अक्षरशः भारावून गेल्याचे दिसत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.