राधिका पाटील यांच्या हस्ते तेजवार्ता दिपोत्सव च्या 21 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

 राधिका पाटील यांच्या हस्ते तेजवार्ता दिपोत्सव च्या 21 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन 

Tejwarta Dipotsav 2024

Tejwarta


 - पुणे-

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवरून प्रसिद्ध होत असलेल्या तेजवार्ता च्या 21 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवार दि . 25 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध सिनेतारका राधिका पाटील यांच्या हस्ते पुणे येथे बालगंधर्व रंगमंदीरात करण्यात आले या प्रसंगी संपादक सय्यद बबलूभाई , कार्यकारी संपादक विनोद ढोबळे , चंद्रा ऑर्केस्ट्रा चे निर्माते शाहीर शैलेश लोखंडे , कॅमेरामन शेख हमजान , अनिस मोमिन , सय्यद अमन , संतोष मोटे , सय्यद रिजवान आदी  उपस्थित होते . ग्रामिण भागातुन प्रसिद्ध होत असणारा तेजवार्ता दिपोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचीत झालेला लोकप्रिय अंक ठरलेला असुन तेजवार्ता न्युज नेटवर्क ने राज्यभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे . याबाबत राधिका पाटील यांनी तेजवार्ता च्या सर्व टिम चे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच तेजवार्ता च्या मुखपृष्ठावर राधिका पाटील यांची आकर्षक प्रतिमा प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांनी संपादक बबलूभाई सय्यद व कार्यकारी संपादक प्रा डॉ . विनोद ढोबळे यांचे आभार व्यक्त केले. राज्यभरातुन विवीध भागातील नामवंत साहित्यीकांच्या वाचनिय साहित्याचा बहारदार नजराना घेऊन हा 21 वा दिपोत्सव अंक प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन वाचकांच्या पसंतीस नक्कीच पात्र ठरेल अशी अपेक्षा तेजवार्ता टिम ने व्यक्त केली आहे . प्रत्येक ठिकाणी तेजवार्ता अंकाचे उत्साहात स्वागत होत असुन वाचकांचा व जाहिरातदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे . त्याबद्दल तेजवार्ता टिम कडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले . काळानुरूप आवश्यक बदल लक्षात घेता तेजवार्ताने सुरु केलेल्या ऑनलाईन वेब चॅनल ला व पोर्टलला राज्यभरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे . सर्वात वेगवान वृत्त प्रसिद्ध करण्याचा तेजवार्ता नेहमीच प्रयत्न करत असतो . सामाजिक बांधीलकी जपत वृत्तांकन करण्यात तेजवार्ता टिम नेहमीच अग्रेसर असते . तसेच  तेजवार्ता फिल्म प्रॉडक्शन च्या माध्यमातुन सामाजिक संदेश देणारे अनेक लघूपटही तेजवार्ता च्या माध्यमातुन प्रेक्षकांनी पाहिले आहेत व त्यांनाही पसंती दर्शविली आहे . तेजवार्ता दिपोत्सवाचे सर्व स्तरातुन जोरदार स्वागत होत आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.