मा.आ. भीमराव धोंडे यांनी केलेल्या शैक्षणिक विकासामुळे गोरगरिबांची मुले उच्चशिक्षित - नानाभाऊ वाडेकर
आष्टी प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्यामुळे मतदारसंघाच्या विकासाबरोबर शैक्षणिक विकासही मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या-वस्तीवरील गोरगरिबांचे मुले मुली उच्चशिक्षित बनली आहेत मतदारसंघाचा यापेक्षाही जास्त शैक्षणिक विकास करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन
पुंडी येथील जेष्ठ कार्यकर्ते नानाभाऊ वाडेकर व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना नानाभाऊ वाडेकर यांनी सांगितले की,
आष्टी पाटोदा शिरूर हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. पुर्वी आष्टी तालुक्यात एक - दोन माध्यमिक शाळा व एकमेव वरिष्ठ महाविद्यालय होते. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात वाढलेले भीमराव धोंडे हे १९८० साली विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ते सलग पंधरा वर्षे विधानसभा सदस्य राहिले, त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज गावागावात, ग्रामीण भागात, डोंगरी भागात त्यांनी सुरू केलेल्या शाळामधून हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. तसेच हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे उच्चशिक्षित होऊन शहरात नोकरी आणि व्यवसाय करीत आहेत. माजी आ. भीमराव धोंडे यांनी सुरू केलेल्या शाळामुळे खेड्यापाड्याचे मुले शिकले आहेत. त्यापूर्वी ग्रामीण भागातील पालक आपल्या मुला मुलींना विशेष करून मुलींना नगर, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत नव्हते. ठराविक पालकच आपल्या पाल्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवत होते,परंतु माजी आ. भीमराव धोंडे यांनी गावागावात शाळा सुरू केल्या. कडा, आष्टी, धानोरा, तिंतरवणी , अंमळनेर येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले तसेच आष्टीत कृषी, वैद्यकीय इंजीनियरिंग, फार्मसी असे सर्व प्रकारचे महाविद्यालये आष्टी येथे सुरू केल्याने तालुक्यातील खेड्यापाड्यातील मुले मुली उच्चशिक्षित बनले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी शैक्षणिक विकासाबरोबर वीस वर्षे विधानसभा सदस्य असताना मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे गावागावात पाझर तलाव केले. गांव, वाड्या, वस्त्या चांगल्या रस्त्याने जोडले आहेत असा सार्वजनिक विकास मोठ्या प्रमाणात केला असल्याचे प्रतिपादन केले.
stay connected