Khuntefal Talav साठी आणखी चार टीएमसी तर पाटोदा शिरूर साठी जायकवाडीतून पाणी आणून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार

 खुंटेफळ तलावा साठी आणखी चार टीएमसी  तर पाटोदा शिरूर साठी जायकवाडीतून पाणी आणून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार

*********************************

निर्धार बैठकीत माजीमंत्री सुरेश धस यांचे प्रतिपादन

********************************

कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुरेश धस यांना आमदार करण्याचा निर्धार

********************************






*********************************


आष्टी (प्रतिनिधी)

सिना मेहकरी उपसा सिंचन खुंटेफळ साठवण तलाव असेल या योजना आणि या योजनेचे मी काम केले आहे.मात्र काहींनी बटन दाबण्याचे काम केलं आणि श्रेय घेण्याचं काम केलं

सीना मेहकरी उपसा सिचन योजनेचे काम मी 97%  असून खुंटेफळ साठवण तलावा मध्ये 1.68 टीएमसी पाणी येणार आहे मात्र एवढ्यावर समाधान होणार नसून आणखी चार टीएमसी पाणी आणेपर्यंत पर्यंत मी शांत बसणार नाही तसेच पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी जायकवाडीतून पाणी आणून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिपादन केले आहे.

आष्टी येथील लक्ष्मी लॉन्स येथील कार्यकर्त्यांच्या निर्धार बैठकीत ते बोलत होते.

    पुढे बोलताना माजी राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले की,सध्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून आष्टीतील आजी माजी आमदारांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत मात्र यांनी  गेल्या दहा वर्षांमध्ये  विकासाचे काय दिवे लावले ? गेल्या दहा वर्षांमध्ये आष्टी तालुक्यामध्ये किती शाळा खोल्या बांधल्या? अनेक ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका किती दिवसापासून घेतल्या नाहीत ? याचे उत्तर  देण्याचे आव्हान माजी मंत्री सुरेश धस यांनी दिले... पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून मी या मतदारसंघाचा आमदार नाही.तरीही लोकांना व कार्यकर्त्यांना अजून मीच आमदार असल्यासारखे वाटत आहे. आष्टी मध्ये सध्या आजी-माजी आमदारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू केले आहेत .मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी दहा वर्षांमध्ये काय विकास केला ? हे सांगावे. आष्टी तालुक्यामध्ये किती शाळा खोल्या मंजूर केल्या ?. संजय गांधी निराधार योजनेच्या किती महिन्यापासून बैठकाच नाहीत त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत.अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने पालक वर्ग रस्त्यावर उतरला आहे. अशीच अवस्था तालुक्यातील अनेक शाळांची झालेली आहे अधिकाऱ्यावर नियंत्रण नसल्याने साध्या वारसाच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून दहा-दहा हजार रुपये घेतले जात आहेत याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे असे प्रतिपादन सुरेश धस यांनी केले. 



कोरोनाच्या काळामध्ये विरोधक घरामध्ये बसलेले असताना मी मात्र वर्षभर माझ्या घरापासून व माझ्या कुटुंबापासून दूर राहून लोकांना वाचविण्याचे काम केले. मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या माध्यमातून तेरा ठिकाणी हॉस्पिटल तर 33 ठिकाणी कोविड सेंटर उभारून लोकांना जीवदान देण्याचे काम केले. विरोधकांनी तर फक्त मोठं मोठ्या निबार शेवग्याच्या शेंगा वाटल्या. त्याही लोकांनी फेकून दिल्याची उपरोधिक टीका सुरेश धस यांनी केली. मी शेकडो रेमडिसिवर इंजेक्शन वाटले. मात्र फोटो कधीही काढला नाही. मात्र विरोधकांनी एक रेमडिसवर इंजेक्शन वाटून फोटोचा सिलसिला सुरू केला होता. माझी आई आजारी असताना सुद्धा मी वर्षभर लोकांमध्ये फिरून कोरोनाच्या रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले. आष्टी मध्ये फक्त सिमेंट वाळू व पेव्हर ब्लॉगचा विकास झाला असून तेही त्यांच्याच माध्यमातून झाल्याचा आरोप त्यांनी केला.मी  सीनामेहकरी योजनेचे काम  97%  केले मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन त्या योजनेचे बटन दाबले व भीमराव धोंडे या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका नाव न घेता त्यांनी केली. या खुंटेफळ योजनेमध्ये 1.68 टीएमसी पाणी येणार आहे मात्र एवढ्यावर समाधान होणार नसून आणखी चार टीएमसी पाणी आणेपर्यंत पर्यंत मी शांत बसणार नाही तसेच पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी जायकवाडीतून पाणी आणून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले. सन 2012 साली मी मंत्री असताना फळबाग योजनेसाठी जो जीआर काढला त्या योजनेचे फायदे आत्ता शेतकऱ्यांना मिळत असून फळबागामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आता सुखी झाला आहे मी मतदार संघात जे काम केले त्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदे झालेले आहेत .



जे काही कमावलेला आहे ते अत्यंत जुजबी आहे मी जे कमवले ती माझी ही प्रेमाची माणस आहेत आणि तीच माझी खरी संपत्ती आहे. लोकांच्या सुखदुःखात जावं लागतं लोकांच्या अडीअडचणी सोडाव्या लागतात लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडावे लागते त्याशिवाय जनमानसात स्थान मिळत नसतं.माझं कुटुंब हे सर्व लोकांच्या सुखदुःखात २४ तास असतं मतदारसंघात कुठेही काही घटना घडली तर ती माझ्या सर्वप्रथम कुटुंब यांना कळते यातच सगळं आलं. 



आज अनेकांचे इच्छुकांचे भावींचे गावभेट दौरे सुरू आहेत आणि त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद भेटत नाही म्हणून संस्थाचालकांनी आपल्या मास्तरांच्या गाड्या लावल्यात तर काहींनी मतदारसंघातली पुढारी गोळा केलेत आणि ते दौऱ्यात सामील करून घेतलेत मला मात्र ही गोष्ट करायची कधीच आवश्यकता पडली नाही. कारण जिथे जाईल तिथे माझ्या अवतीभवती माणसा जमा होतात हीच माझी खरी संपत्ती आहे. कायम सर्व सामान्यांच्या प्रश्नांची योग्य मांडणी विधानसभेत वेळोवेळी केली कारण ज्याला ग्रामीण भागातली जाण असते आणि जो त्यांचे प्रश्न खंबीर नेत्या मांडतो त्याच्याकडेच नेतृत्व दिले जातात आणि म्हणूनच मला विश्वास आहे ही माझी जनता मला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणार आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कितीही समोर येऊन द्या त्यांना एकटा बास. सिना मेहकरी उपसा सिंचन खुंटेफळ साठवण तलाव असेल या योजना आणि या योजनेचे मी काम केले आहे.मात्र काहींनी बटन दाबण्याचे काम केलं आणि श्रेय घेण्याचं काम केलं परंतु ज्या वेळेस या योजना राबवायच्या होत्या आणि मंजूर करून घ्यायच्या होत्या त्यावेळेस मात्र याच लोकांनी विरोध केला होता. आणि ही योजना कशी खोटी आहे हे सांगायचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या वेळेस हे सत्यात उतरत आहे त्यावेळेस लोकांना कळून चुकला आहे की खरं कोण आणि खोटे कोण हे जनतेच्या लक्षात आले आहे.यावेळी आष्टी,पाटोदा ,शिरूर, मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या बैठकीचे नियोजन असताना सभेत झाल्याचे चित्र कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण  उपस्थित वातावरणातून दिसत होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.