माझ्या काळात सर्वाधिक विकास :- माजी आमदार Bhimrao Dhonde, पाटोदा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

माझ्या काळात सर्वाधिक विकास :- माजी आमदार भीमराव धोंडे, 
पाटोदा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद 




आष्टी ( प्रतिनिधी):- मी वीस वर्ष विधानसभा सदस्य असताना आष्टी विधानसभा मतदारसंघाचा सर्वाधिक विकास माझ्याच काळात झाला आहे असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा तालुक्यातील विविध ठिकाणांच्या गावभेट दौऱ्यात केले. 

        याबाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आ. भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात गेल्या दिड महिन्यापासून गाव भेटीचा दौरा सुरू केला आहे.

 मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी  रविवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत पाटोदा तालुक्यातील येवलवाडी (स), पारनेर , कुटेवाडी, नागेशवाडी, गवळवाडी, धनगर जवळका, तांबाराजुरी, उंबरविहीरा, चुंबळी, तळेपिंपळगाव,करंजवन, जौळाला,थेरला,रोहतवाडी,

नायगाव (मयुर),पिठ्ठी,बेदरवाडी, डोमरी या गावांचा दौरा केला. 

 वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना 

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी विधानसभा सदस्य असताना मोठ्या प्रमाणावर पाझर तलावांची कामे केली. तसेच रस्ते विकास झाला. त्यापुर्वी अनेक गावे, वाड्या, वस्त्यांना जायला साधा रस्ता सुद्धा नव्हता. माझ्या काळात कोट्यवधी रुपयांची रस्ते कामे केली आहेत. तसेच कोणत्याही कामात कधी कमिशन घेतले नाही. अनेक ठिकाणी विविध विषयांवर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

         दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजयदादा धोंडे,पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सरपंच बाळासाहेब पवार,

संजय  कांकरिया, अभिलाष गाडेकर पाटील, दिलीपराव मस्के,माजी उपसभापती देविदास शेंडगे,अंकुशराव मुंडे व इतर प्रमुख कार्यकर्ते सोबत होते. 

गावागावात झालेल्या छोटेखानी सभेस हनुमंत महाराज येवले, उपसरपंच परशुराम टेकाडे, संपत टेकाडे, बदामराव येवले, भुजंग येवले, सरदार भाई पठाण,  अशोक येवले, मनोहर टेकाडे, राहुल फौजी, गणेश अंदुरे, माजी उपसरपंच गहिनीनाथ क्षिरसागर, संतोष दगळे, अशोक अंदुरे, बाळासाहेब अंदुरे, रोहन अंदुरे,, बाळासाहेब धुमाळ, सोपान जाधवर, नवनाथ नेहेरकर, धनंजय बांगर, संतोष बांगर, शंकर कुटे, संदीप गडदे, कृष्णा नेहेरकर,भाऊराव गवळी, गोवर्धन गवळी, सोंडगे सर, देविदास गवळी, सचिन शेळके,माजी सरपंच बाजीराव शिंदे, सुरेश जाधव,उपसरपंच नवनाथ काळे, वसंतराव कळे, विष्णू गाडेकर, जिवन गाडेकर, सुरज काळे, अजय काळे, राम पारखे, प्रभाकर काळे, महेश संचेती, पत्रकार हमिद पठाण, 

 माजी सरपंच गोविंद पुरी, चंद्रकांत तांबे, संभाजी तांबे, सचिन तांबे, आण्णा तांबे, निजाम भाई,माजी सरपंच बोरकर, , अश्रुबा पवळ, मुफ्ती सहाब, 

माजी सरपंच सुसलाटे, माजी हरिश्चंद्र चौरे, माजी सरपंच कल्याण चौरे, माजी सरपंच सुनील चौरे,  बाळासाहेब चौरे पाटील, कुर्लेकर, चौरे बाबु, अशोक सुसलाटे, सरपंच बाळासाहेब राख, गणेश राख, विनोद राख, आमोल नागरे, मनोज राख, सुरेश राख, बाळु सोनवणे, राहुल राख, विनोद राख, उध्दव नागरे,विष्णूपंत दादा, दशरथ मामा, गोवर्धन नागरगोजे, हरि कचरे, बबन सांगळे, ज्ञानदेव वनवे, केदार राख, संतोष वनवे, कारभारी डफळ, संतराम कदम, रघुनाथ नागरगोजे, परमेश्वर नागरगोजे, मधुकर गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.