आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रास शासनाची मान्यता
आष्टी प्रतिनिधी
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून "प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान" या योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये "आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र" ची स्थापना करणे बाबत शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. या "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" साठी महाराष्ट्र शासनाने आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी यांची निवड केलेली आहे. अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील डी. कोल्हे यांनी दिले आहे. याबद्दल प्राचार्य यांनी महाराष्ट्र शासनाचे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांचे आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा चे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री महोदय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्चुअल/ ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास दूरदृष्टी प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती डॉ.सी.पी. राधाकृष्णन मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य, श्री एकनाथजी शिंदे साहेब मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री नितीनजी गडकरी मा. केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, श्री देवेंद्रजी फडणवीस मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री अजितजी पवार मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व ज्यांची ही संकल्पना आहे ते श्री मंगल प्रभात लोढा मा. मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग, श्री सुशील उचले सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड, आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये होणाऱ्या या भव्य कार्यक्रमास, कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेले मान्यवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब, संस्थेचे सहसचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अजयदादा धोंडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी. राऊत, आष्टी परिसरातील शासकीय अधिकारी वर्ग, तसेच आष्टी मधील सामाजिक, राजकीय मान्यवर, तसेच आनंद शैक्षणिक संकुल व आष्टी मधील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक, तसेच परिसरातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ,पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 12.30 वा. हा भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आष्टी परिसरातील सर्व मान्यवरांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान प्राचार्यांनी केलेले आहे.
विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याचे शिक्षण हे कौशल्यपूर्ण असावे, विद्यार्थ्याला आपल्या वेगवेगळ्या कौशल्याच्या आधारे रोजगार मिळावा असे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना वाटते त्यांनी त्यासाठी कौशल्य विकास केंद्र ची स्थापना केली व याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्राचे मा.मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग चे मंत्री श्री मंगल प्रभात जी लोढा साहेब यांनी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी व मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील युवक व युवतींना रोजगार मिळावा, नोकऱ्यांमध्ये वाढ व्हावी, यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करून महाराष्ट्रामधील कॉलेजेसला प्रोत्साहित केले व या आचार्य चाणक्य विकास केंद्राची स्थापना करून वेगवेगळ्या नवीन कोर्सेस ला मान्यता देऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी व रोजगार वाढवण्यासाठी केंद्रांची स्थापना करून याचे उद्घाटन 20 सप्टेंबरला आयोजित केलेले आहे. या आचार्य चाणक्य विकास केंद्राचा महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना व आष्टीच्या फार्मसी कॉलेजमध्ये सुरू झालेल्या आचार्य चाणक्य विकास कौशल्य केंद्राच्या आष्टी परिसरातील व बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणारच आहे. यामधून विद्यार्थ्यांची उद्योजकता, विद्यार्थ्याचे कौशल्य वाढणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगारही मिळणार आहे. आष्टीच्या आचार्य चाणक्य विकास कौशल्य केंद्रामध्ये तीन कोर्सला मान्यता मिळालेली आहे 1) इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन बेसिक (60 विद्यार्थी) 2) मेडिकल इक्विपमेंट असिस्टंट बेसिक क्लीनिकल इक्विपमेंट (60 विद्यार्थी) 3) जेरियाट्रिक केअरगिव्हर (संस्थात्मक आणि गृह) (30 विद्यार्थी).
यामधील पहिला कोर्स इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन बेसिक :वैद्यकीय संचालक डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध सेटिंग्जमध्ये काम करतात. आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ हे हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रशिक्षित प्रदाता असतात. आपत्कालीन चिकित्सकांना आपत्कालीन परिस्थिती, जसे की अपघात किंवा आपत्ती क्षेत्र त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. हे तंत्रज्ञ बहुतेक रुग्णवाहिकांमध्ये आढळतात कारण आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सर्वात प्रथम पोहोचते आणि या तंत्रज्ञांना या परिस्थितीसाठी प्रशिक्षण दिले जाते. रुग्णवाहिका, सरकारी आणि रुग्णालयांमध्ये सेवा देण्याव्यतिरिक्त ते अग्निशमन विभाग आणि पोलिस विभागातही काम करतात. तंत्रज्ञ सरावाच्या मर्यादित कार्यक्षेत्रात काम करतात. ते वैद्यकीय संचालकांच्या देखरेखीखाली काम करतात. हे तंत्रज्ञ सामान्यत: हॉस्पिटल वाहतूक सेवा , रुग्णवाहिका सेवा , बचाव आणि अग्निशमन विभाग आणि आरोग्य सेवा सुविधांद्वारे नियुक्त केले जातात .आपत्तीग्रस्त भागात पोहोचल्यानंतर, ते पीडितांना रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांना प्रथमोपचार देतात, पीडितेच्या स्थितीचे मूल्यांकन करतात आणि उपचार निश्चित करतात, पीडिताची स्थिती स्थिर करण्यासाठी जखमेवर मलमपट्टी करतात, रक्तस्त्राव नियंत्रित करतात.
यामधील दुसरा कोर्स मेडिकल इक्विपमेंट असिस्टंट बेसिक क्लीनिकल इक्विपमेंट - या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा एक समूह विकसित करणे आहे जे वैद्यकीय उपकरणांद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात. उत्पादक, पुरवठादार आणि सेवा प्रदाते आणि रुग्णालयांचे जैव-वैद्यकीय विभाग स्थापना, दुरुस्ती आणि मदत करण्यासाठी मूलभूत वैद्यकीय उपकरणे आणि उपकरणांची देखभाल. हा कोर्स 10+2 पार्श्वभूमीसह वैयक्तिक तयारीसाठी सज्ज आहे. प्राधान्याने किंवा विशिष्ट परिस्थितींमध्ये दहावी आणि ज्यांना हेल्थकेअरमध्ये वैद्यकीय उपकरणे तंत्रज्ञ म्हणून नोकरी करायची आहे सेटिंग किंवा सेवा प्रदाते. हा कार्यक्रम तपासणी, स्थापनेसाठी आवश्यक कौशल्ये संपादन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. मूलभूत क्लिनिकल उपकरणे आणि त्यांच्याशी संबंधित वैद्यकीय उपकरणे/इलेक्ट्रॉनिक प्रणालींची प्रतिबंधात्मक देखभाल आणि समस्यानिवारण, सर्व सेवा क्रियाकलापांसाठी योग्य दस्तऐवज आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे समाविष्ट आहे. वर
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थी सक्षम होतील:
वैद्यकीय उपकरणे वितरीत आणि सेटअप
रुग्णालय/सुविधा कर्मचाऱ्यांना तांत्रिक सहाय्य, शिक्षण आणि प्रशिक्षण द्या
कॅलिब्रेट करा आणि उपकरणांच्या देखभालीमध्ये मदत करा
उपकरणातील बिघाडांचे निदान, दुरुस्ती आणि ऑन-कॉल आणि ऑन-साइट सहाय्य प्रदान करा
तृतीय पक्ष दुरुस्ती आणि देखभाल कामाचे वेळापत्रक आणि देखरेख
मूलभूत क्लिनिकल उपकरणांसाठी बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सेवा सुलभ करा
बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल प्रोटोकॉलचे पालन करा
संसर्ग नियंत्रण धोरणे आणि प्रक्रियांचे पालन करा
वैयक्तिक स्वच्छतेच्या गरजा राखण्यासाठी तंत्रे दाखवा
वैद्यकीय आणि सुविधा आणीबाणीच्या प्रसंगी कृतींचे प्रदर्शन करा
बायो-मेडिकलच्या व्यावसायिक व्यवहारात व्यावसायिक वर्तन, वैयक्तिक गुण आणि वैशिष्ट्ये प्रदर्शित करा
इन्स्ट्रुमेंटेशन सेवा
वैद्यकीय उपकरणे तंत्रज्ञांच्या भूमिकेत उत्तम संवाद साधा, अचूक आणि योग्य संवाद साधा
यामधील तिसरा कोर्स जेरियाट्रिक केअरगिव्हर (संस्थात्मक आणि गृह) या नोकरीतील व्यक्तींनी जेरियाट्रिक केअरगिव्हर म्हणून जेरियाट्रिकला काळजी प्रदान करणे आवश्यक आहे. विविध कामाच्या सेटिंग्जवर जसे की संस्थात्मक आणि होम केअर सेटअप. हे व्यावसायिक जेरियाट्रिक्सचे साथीदार म्हणून काम करतात आणि देखभाल करण्यास मदत करतात
दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप, पुनर्वसन, आजारी आरोग्य स्थितीचा सामना करणे, प्रदान करणे आरोग्य सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थन. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एल्डरली केअर सारख्या नावाने संबोधले जाऊ शकते.अटेंडंट किंवा जेरियाट्रिक एड्स, जेरियाट्रिक केअरगिव्हर्स इ. हे व्यावसायिक च्या आरोग्य सेवा प्रदाते आणि व्यावसायिकांच्या जवळच्या सहकार्याने कार्य करा. हेल्थकेअर टीममध्ये डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक इत्यादींचा समावेश आहे आणि प्रदान करणे निर्दिष्ट आरोग्य सेवा.
या तिन्ही कोर्ससाठी विद्यार्थ्यांची पात्रता ही कमीत कमी विद्यार्थी हा बारावी पास असणे आवश्यक आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याची मान्यता आष्टीच्या फार्मसी कॉलेजला मिळाल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब, तसेच संस्थेचे सहसचिव डॉ. अजय दादा धोंडे, संस्थेचे संचालक श्री अभयराजे धोंडे, संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी डॉ डी. बी. राऊत , श्री शिवदास विधाते, श्री.माऊली बोडखे व श्री संजय शेंडे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व या कौशल्य केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थीनी कौशल्य पूर्ण व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली, हे सर्व कौशल्य प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे याची सर्व पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
stay connected