मा.आ.भीमराव धोंडे यांच्या आनंद चॅरिटेबल संस्थेला इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेला शासनाची मान्यता
आष्टी प्रतिनिधी
मा .आ.भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नातून आनंद चॅरिटेबल संस्था संचलित आष्टी पब्लिक स्कूल आष्टी या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेला शासनाची मान्यता मिळाली असून या शाळेमध्ये धनगर समाजाच्या मुला मुलींना मोफत शिक्षण व वस्तीगृहात मोफत प्रवेश मिळणार आहे तसेच जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील सर्व पालकांना आनंदाची बातमी की सर्व गरीब ,हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण व वस्तीगृहात प्रवेश मोफत मिळणार आहे आष्टी- पाटोदा- शिरूर विधानसभा मतदारसंघातिल व बीड सह इतर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक ,विद्यार्थी व पालक यांच्या कडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमराव धोंडे व संस्थेचे सहसचिव डॉ अजय दादा धोंडे , प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत, शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे यांचे अभिनंदन होत आहे तरी आष्टी -पाटोदा -शिरूर व इतर तालुक्यातील विद्यार्थी यांनी या मोफत प्रवेशाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे प्रवेशासाठी प्रत्यक्ष आष्टी- अहिल्या नगर रस्त्यालगत असणार्या आष्टी पब्लिक स्कूल येथे संपर्क साधावा किंवा 9860705398,9404029555 या नंबर वर संपर्क साधावा


stay connected