भारतीय जवान किसान पार्टीचा मराठवाडा ओला दुष्काळ पाहणी दौरा
शेतकरी व सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - प्रदेशाध्यक्ष अंकुश खोटे यांचे आवाहन
आष्टी प्रतिनिधी - मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातल्याने काढणीस आलेली खरिपाची पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांना धीर देत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून धीर देण्यासाठी 'भारतीय जवान किसान पार्टी'चा मराठवाडा ओला दुष्काळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी आणि सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी असे आवाहन भारतीय जवान किसान पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माजी सैनिक अंकुश खोटे यांनी शनिवार दि. 7 रोजी 'तेजवार्ता'शी बोलताना सांगितले.
शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसापासून मराठवाडयातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे काढणीस आलेली पिके हातची गेल्याने शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यामध्ये वर्षांनुवर्षे भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते.परंतु या भागात सध्या ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी परत एकदा हातबल झाला आहे. याची पाहणी करण्याकरीता परभणी येथून दिनांक 9 पासून स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे भोसले, प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नारायण अंकुशे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जवान किसान पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माजी सैनिक अंकुश खोटे यांनी दिली आहे.
दौरा पुढीलप्रमाणे-
स. ०८:३० : उंचाडा, (ता. हदगाव)
स. ०९:०० : मारलेगाव
स. ०९:३० : धानोरा
स. १०:०० : स्वराज्य जनसंपर्क कार्यालय, हदगाव येथे पत्रकार परिषद. तसेच
सर्व नेत्यांचा एकत्रित पाहणी दौरा परभणी -
दु. १२:०० : परभणी विश्रामगृह
दु. ०१:०० : मौजे वझुर या गावी नुकसान पाहणी शेतकऱ्यांशी संवाद व परभणी कडे रवाना. दु: ०४ : परभणी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे. तरी वरील दौऱ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी माजी सैनिक अंकुश खोटे यांनी केले आहे.



stay connected