निवडणुकीच्या तोंडावर आष्टी शहरातील युवकांची आ.बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाला पसंती
आष्टी प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एक महिन्यावर येऊन ठेपले असून सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरू आहे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे यातच आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी आष्टी शहरातील फुलेनगर येथील युवकांनी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बाळासाहेब आजबे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून पाच वर्षांमध्ये आमदार आजबे काका यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात विकासकामे केली आहेत आमदार आजबे यांचा स्पष्टवक्ते पणा व कार्यकर्त्यावर असणारे प्रेम पाहता आम्ही युवा नेते यश भैय्या आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले
आष्टी शहर फुलेनगर येथील युवकांनी युवा नेते यश भैया आजबे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे
यावेळी युवा नेते यश भैया आजबे , युवक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले नगरसेवक नाझीम भैया शेख, आष्टी युवक शहराध्यक्ष विजय देशमुख, डॉ जयेश हंबर्डे ,संतोष कदम विद्यार्थी तालुकाध्यक्ष अक्षय हळपावत दीपक भैय्या पिसाळ, दिव्य शेट्टी ,आयाज भाई कुरेशी, ऋषिकेश वाल्हेकर आकाश पवळे, सचिन वाल्हेकर अक्षय वाल्हेकर शिवम वाल्लेकर किरण शिंदे भीमराव खंडागळे गणेश वाल्हेकर दिगंबर वाल्हेकर योगेश वाल्हेकर अनिल वाल्हेकर लाला वाल्लेकर सुमित वाल्लेकर स्वप्निल वाल्लेकर पोपट डाडर शंकर डाडर गणेश वामदंडे अजय वामदंडे आदी उपस्थित होते.
stay connected