आष्टी तहसीलमध्ये अधिकाऱ्यांसमवेत समाजसेवक सुरेश पाटलांनी घेतली बैठक.
आष्टी /प्रतिनिधी
पाटोदा विभागीय प्रांत अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे सह महसूल विभागाची समाजसेवक सुरेश पाटील यांनी तहसील कार्यालय आष्टी येथे बैठक घेवून तालुक्यातून जाणारा सुरत-चैनई महामार्गाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात योग्य सूचना व आदेश शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी दिल्या.
आष्टी तालुक्यातून जाणारा सुरत-चेन्नई महामार्ग याचे जमीन अधिग्रहणाचे काम सद्या चालू असून, अधिग्रहणात कोणत्याही कमतरता राहणार नाहीत. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. योग्य ते पंचनामे करून तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाला पाठवण्याच्या सूचना शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी महसूल विभागाला दिल्या आहे.
महामार्गाचे जमीन अधिग्रणाचे काम सध्या सुरू झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत त्या शेतकऱ्यांचे घर ,झाडे ,जमीन, पत्र्याचे शेड,कांदा चाळ,गायगोठे, विहीर, फळझाडे, दगडीच्या पवळी, इत्यादीं सर्व योग्य ती माहिती घेऊन सर्व शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते अहवाल शासनाला पाठवावा. अशा सुचना प्रांत अधिकारी प्रमोद कुदळे सह महसुल कर्मचारी यांना सुरेश पाटील यांनी बैठकतून दिल्या.
stay connected