*शिनगीरे आणि अरुण पडोळे यांचा जिल्हाधिकारी पाठक यांच्या हस्ते गौरव*
****************************
*उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चौथ्यांदा सन्मान*
*****************************
*****************************
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वटणवाडी सहकारी सेवा सोसायटीचे किरण शिनगीरे व सचिव अरुणजी पडोळे यांचा अविनाशजी पाठक जिल्हाधिकारी बीड, ठोंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,समृद्ध जाधव जिल्हा उपनिबंधक बीड, अशोकरावजी कदम औसाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), या मान्यवरांच्या हस्ते 27 सप्टेंबर रोजी बँकेच्या 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमांमध्ये बीड येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी माजी आमदार रमेश आडसकर,माजी आमदार केशव आंधळे,राजाभाऊ मुंडे, गंगाधर आगे, बीड जिल्ह्यातील सर्व सहकारी सेवा सोसायटी चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिनगिरे यांच्यासोबत सहकारी सेवा सोसायटीचे सचिव अरुण पडोळे, जेष्ठ तपासणीस आष्टी तालुका शारदजी आजबे, सचिव महेश कोकणे, गणेशजी देशपांडे, हे उपस्थित होते.
stay connected